पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 01:46 PM2021-07-12T13:46:40+5:302021-07-12T13:46:47+5:30

रविवार पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत रामटेकडी येथे एमआयडीसी पुणे कचरा विलगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीच्या दुचाकीवर दोघे थांबल्याची खात्रीशीर माहिती होती.

Two persons arrested for stealing vehicles and mobiles from Pune district; One lakh items confiscated | पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देआरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यातील २ तर कोंढवा, लोणी काळभोर, वानवडी आणी वाकड पोलीस ठाण्याचे हद्दीतील प्रत्येकी १ असे वाहनचोरीचे ६ गुन्हे असल्याचे उघडकीस आले आहे.

लोणी काळभोरपुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यात वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना जेरबंद करून त्याच्याकडून १ लाख ५३ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आहे. यांतील एकजण ५ गुन्ह्यातील रेकॉर्डवरील फरारी आरोपी आहे. याप्रकरणी आकाश दयानंद गायकवाड ( वय २२, रा. उरूळी देवाची, ता. हवेली ) प्रशांत मधुकर भोसले (वय २० रा.पालखी मार्ग, उरूळी देवाची ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हडपसर, कोंढवा आणि लोणी काळभोर या भागात होणाऱ्या वाहनचोरी आणि मोबाईल चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती.

रविवार पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत रामटेकडी येथे एमआयडीसी पुणे कचरा विलगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीच्या दुचाकीवर दोघे थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदर ठिकाणी पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने गायकवाड व भोसले यांना दुचाकीसह पकडले. त्यांच्याकडील दुचाकीबाबत माहिती घेतल्यावर ती वानवडी पोलीस ठाण्याचे हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याजवळ १८ हजारांचे दोन मोबाईल मिळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी मोटरसायकल चोरी करून व उरूळी देवाची येथील एका इमारतीच्या मागे विहिरीजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले.

पथकाने तेथून लोणी काळभोर, हडपसर, वानवडी, कोंढवा, वाकड या पोलीस ठाण्याचे हद्दीत चोरलेल्या  १ लाख ५३ हजार रूपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे हडपसर पोलीस ठाण्यातील २ तर कोंढवा, लोणी काळभोर, वानवडी आणी वाकड पोलीस ठाण्याचे हद्दीतील प्रत्येकी १ असे वाहनचोरीचे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्यांनी चोरी केलेल्या मोबाईल फोन बाबत तपास चालू आहे.

Web Title: Two persons arrested for stealing vehicles and mobiles from Pune district; One lakh items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.