गावठी पिस्टलसह दोन जण अटकेत, मावळ तालुक्यात पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 17:14 IST2023-10-10T17:12:50+5:302023-10-10T17:14:55+5:30
या प्रकरणी पोलिस हवालदार श्रीशैल कंटोळी यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती....

गावठी पिस्टलसह दोन जण अटकेत, मावळ तालुक्यात पोलिसांची कारवाई
वडगाव मावळ (पुणे) : स्वत:जवळ गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन जणांना वडगाव पोलिसांनी अटक केली. सागर किसन गराडे (वय२२), सुशांत सुरेश सुतार (२२, दोघे रा. जांभूळ, ता. मावळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार श्रीशैल कंटोळी यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळ गावच्या हद्दीत मरीमाता मंदिराजवळ सागर किसन गराडे याच्याकडे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली. सागरकडे चौकशी केली असता, हे पिस्टल सुशांत सुतार याने त्याच्याकडे असलेल्या पिस्टलपैकी एक असून, दोन काडतुसे त्याने माझ्याकडे दिली, असे सांगितले. या प्रकरणी सहायक फौजदार जावळे तपास करत आहेत.