ललित पाटील प्रकरणात अटक केलेले दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

By नम्रता फडणीस | Published: November 21, 2023 04:42 PM2023-11-21T16:42:24+5:302023-11-21T16:42:33+5:30

आतापर्यंत एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस दलातून निलंबित

Two police personnel arrested in Lalit Patil case dismissed | ललित पाटील प्रकरणात अटक केलेले दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

ललित पाटील प्रकरणात अटक केलेले दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले.
   
नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ललित ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी आतापर्यंत एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. ललित पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवून ससूनमधील वाॅर्ड क्रमांकमध्ये बंदोबस्तास असलेले पोलीस कर्मचारी काळे आणि जाधव यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने दोघांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. काळे आणि जाधव यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली, तसेच गंभीर स्वरुपाचे शिस्तभंग आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवून दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: Two police personnel arrested in Lalit Patil case dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.