ललित पाटील प्रकरणात दोन पोलिसांना अटक; दोघेही ससूनमध्ये बंदोबस्तासाठी होते कर्तव्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 07:56 IST2023-11-18T07:56:25+5:302023-11-18T07:56:32+5:30
ललित पाटील २ ऑक्टोबरला पसार झाला होता.

ललित पाटील प्रकरणात दोन पोलिसांना अटक; दोघेही ससूनमध्ये बंदोबस्तासाठी होते कर्तव्यावर
पुणे : कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारांच्या नावाखाली दाखल झालेला ड्रग्जमाफिया ललित पाटील पलायन प्रकरणात दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी त्या पोलिसांची नावे आहेत. ललितने पलायन केले त्यावेळी हे दोघेही ससूनमध्ये बंदोबस्तासाठी कर्तव्यावर हजर होते. ललित पाटील २ ऑक्टोबरला पसार झाला होता.
संशयाच्या भोवऱ्यात
नाथाराम काळे याने आरोपी हाताला हिसका देऊन पळून गेला, असे सांगितले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ललित निवांत रस्त्याने पायी चालत जात असल्याचे दिसून आले. ललित पळून गेल्यावर ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला त्याच हॉटेलमध्ये थोड्या वेळाने पोलिस कर्मचारीही दिसल्याने बंदोबस्तावरील पोलिस संशयाच्या भोवऱ्यात आले होते.