बघ्याची भूमिका घेणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, सिंहगड रोडवरील शस्त्रधारी गुंडाचा नाच प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:21 PM2021-02-27T20:21:38+5:302021-02-27T20:22:07+5:30

नर्हेतील मार्तंड प्रतिष्ठान येथील सार्वजनिक रोडवर १५ साथीदारांसह रात्री ११ वाजता त्याने हातात कोयते, पिस्तुल घेऊन नाच केला.

Two policemen suspended for taking on the role of watch when criminal dance | बघ्याची भूमिका घेणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, सिंहगड रोडवरील शस्त्रधारी गुंडाचा नाच प्रकरण 

बघ्याची भूमिका घेणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, सिंहगड रोडवरील शस्त्रधारी गुंडाचा नाच प्रकरण 

googlenewsNext

पुणे : औंध परिसरात शस्त्रधारी चोरट्यांना पाहून पोलिसांनी पळ काढल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पोलिसांनी तडीपार गुंड रोशन लोखंडे सह अनेक जण हातात काेयते व पिस्तुल घेऊन नाच करत असताना बघ्याची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. तसेच हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनाही कळविला नाही. याप्रकरणी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

पोलीस शिपाई महेंद्र मोहन राऊत आणि सुशांत सतीश यादव अशी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

नर्हेतील मानाजीनगर परिसरात १८ फेब्रुवारी रोजी तडीपार गुंड रोशन लोखंडे याने एका व्यक्तीला लुटले. त्यानंतर नर्हेतील मार्तंड प्रतिष्ठान येथील सार्वजनिक रोडवर १५ साथीदारांसह रात्री ११ वाजता त्याने हातात कोयते, पिस्तुल घेऊन नाच केला. यामुळे परिसरात दहशत निर्माण करुन नागरिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. पोलीस कर्मचारी राऊत व यादव हे नर्हे पोलीस चौकात असताना त्यांना हा प्रकार समजला. ते घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांनी आरोपींना थांबविण्याचा अथवा पकडण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. एवढा गंभीर प्रकार असतानाही त्यांनी त्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली नाही.

या तडीपार गुंडांनी नंगा नाच केल्याचा व्हॉट्सअप व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब वरिष्ठांना समजली. त्यानंतर रोशन लाेखंडेसह काही जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकाराची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार राऊत व यादव यांना माहिती असल्याचे समोर आले. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी दोघांना निलंबित केले.

Web Title: Two policemen suspended for taking on the role of watch when criminal dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.