दौंड शुगर कारखान्याला दोन पुरस्कार

By admin | Published: March 29, 2017 11:58 PM2017-03-29T23:58:23+5:302017-03-29T23:58:23+5:30

आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सन २०१५-१६ या हंगामाकरिता दिला

Two prizes for Daund Sugar Factory | दौंड शुगर कारखान्याला दोन पुरस्कार

दौंड शुगर कारखान्याला दोन पुरस्कार

Next

देऊळगावराजे : आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सन २०१५-१६ या हंगामाकरिता दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार’ आणि ‘उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन’ या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मांजरी बुद्रुक (पुणे) येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दौंड शुगरला मध्य विभागातून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्यासह कारखान्याचे व्यवस्थापक यांनी स्वीकारला. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव वळसे-पाटील, शिवाजीराव नागवडे, जयंत पाटील, दौंड शुगरचे चेअरमन जगदीश कदम, शहाजी गायकवाड, प्रद्युम्न जोशी, शशिकांत गिरमकर, विजयकुमार सावरीकर, प्रवीणकुमार काळे, दीपक वाघ, संदेश बेनके, आबासाहेब सुरवसे, शिवकांत काळे, चंद्रकांत सुद्रिक उपस्थित होते.

Web Title: Two prizes for Daund Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.