भाविकांना लुटणारे दोन चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:18 AM2019-01-07T00:18:03+5:302019-01-07T00:18:52+5:30
बारामती गुन्हे शोध पथकाची कारवाई : मुद्देमालाची जप्ती, एक आरोपी फरार
सांगवी : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना रस्त्यावर अडवून मारहाण करून जबरी चोरी करणाºया दोघांना शनिवारी (दि. ५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून जेरबंद करण्यात आले. अशी माहिती बारामती गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
रणजित रघुनाथ जाधव (वय २४), राहुल एकनाथ भंडलकर (वय २३, रा. दोघे रा. खांडज, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सनी उदावंत (रा. प्रगती नगर, बारामती) हे २९ डिसेंबर रोजी लाकडी-कन्हेरी रोडला रोजी हे सायंकाळी म्हसोबा मंदिराजवळून बारामतीकडे निघाले होते. त्यावेळी काळ््या रंगाच्या पल्सर गाडीवर आलेल्या तीन अज्ञात इसमानी त्यांना अडवून मारहाण करत दोन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची चैन, सॅमसंगचा एक मोबाईल असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जरबदस्तीने हिसकावून नेला. त्या तीन अज्ञात चोरट्यांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा तपासासाठी पथक तयार केले होते. त्याचवेळी खांडज (ता. बारामती) येथील दोन मुले बारामतीमध्ये संशयीतरित्या फिरत असून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले त्या वेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचा आणखी एक साथीदार सीताराम अंकुश भंडलकर हे फरार झाले.
अश्लील फोटो, एसएमएस पाठवल्याप्रकरणी गुन्हा
सांगवी : १९ वर्षीय तरुणीस सोशियल मीडियावरुन एसएमएसद्वारे अश्लील भाषा वापरून फोटो पाठवल्या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन स्वामी वायकर (रा. भोसरी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांन सांगितलेली माहिती अशी की, २२ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी दरम्यान मेडद (ता. बारामती) येथील १९ वर्षीय तरुणीला आरोपी कुंदन वायकर याने सोशलमिडीया वरून अश्लिल भाषा वापरत एसएमस केले असल्याची तक्रार एका तरूणीने पोलीस हवालदार जयंत ताकवणे यांच्याकडे केली होती.