दोन जागा बिनविरोध

By admin | Published: May 3, 2017 01:46 AM2017-05-03T01:46:56+5:302017-05-03T01:46:56+5:30

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून

Two seats uncontested | दोन जागा बिनविरोध

दोन जागा बिनविरोध

Next

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून झाल्याने १७ जागांसाठी सुमारे ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज (दि.२) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादीच्या दोनही पक्षांच्या नेत्यांना उमेदवारांच्या माघारी घेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. माघार घेण्याच्या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गजांनी माघार घेतली. या वेळी कृषी व पणन मतदार संघातून राष्ट्रवादीचे हनुमंत सासवडे, तर ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून भाजपाच्या तृप्ती संतोष भरणे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजपा अशा दोन्ही पक्षांनी दमदार पॅनेल उभे करत एकमेकांसमोर खडे आव्हान निर्माण केले आहे. राष्ट्रवादी व भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकून खाते खोलले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार दोन्ही पक्षांकडून करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी जाहीर केली, तर भाजपाच्या उमेदवारांची अंतिम यादी भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके यांनी जाहीर केली. या वेळी अशोक पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढविली जाणार असून शेतकरी विकास हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तर दादा पाटील फराटे व भगवान शेळके यांनी सक्षम पॅनेल उभा केला असल्याचे सांगत विरोधकांना चांगले आव्हान निर्माण केले असल्याचे सांगितले.(वार्ताहर)

भाजपा उमेदवार
कृषी पतसंस्था मतदार संघ (सर्वसाधारण)
अ‍ॅड. देवराम धुमाळ, राहुल गवारे, आनंदराव हरगुडे, अशोक माशेरे, तात्यासाहेब सोनवणे, गणेश मचाले, संतोष मोरे
कृषी पतसंस्था मतदार संघ (महिला)-छाया अप्पासाहेब बेनके, सुजाता गाजरे
कृषी पतसंस्था मतदार संघ (इतर मागास)-विकास शिवले
कृषी पतसंस्था मतदार संघ (भटक्या विमुक्त जाती/जमाती)- डॉ. हेमंत पवार
ग्रामपंचात मतदार संघ (सर्वसाधारण)-अनिल नवले, संभाजी कर्डिले
ग्रामपंचात मतदार संघ (अनुसूचित जाती/जमाती)- तुकाराम थोरात
ग्रामपंचात मतदार संघ (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)-तृप्ती संतोष भरणे(बिनविरोध)
हमाल व तोलार मतदार संघ-कुंडलिक दसगुडे

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
कृषी पतसंस्था मतदार संघ (सर्वसाधारण)-शशिकांत दसगुडे, विश्वास ढमढेरे, अ‍ॅड. वसंतराव कोरेकर, शिवाजी वडघुले, बाबाजी निचित, शंकर जांभळकर, प्रकाश पवार,
ग्रामपंचात मतदार संघ (सर्वसाधारण)-मानसिंग पाचुंदकर, धैर्यशिल मांढरे,
ग्रामपंचात मतदार संघ (अनुसूचित जाती/जमाती)- विजेंद्र गद्रे
कृषी पतसंस्था मतदार संघ (महिला)-मंदाकिनी पवार,कौशल्या भोर
कृषी पतसंस्था मतदार संघ (इतर मागास)-अनिल भुजबळ
कृषी पतसंस्था मतदार संघ (भटक्या विमुक्त जाती/जमाती)-सतीश कोळपे
कृषी व पणन प्रक्रिया मतदार संघ-हनुमंत सासवडे (बिनविरोध)

Web Title: Two seats uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.