दोन सोसायट्यांमध्ये सात घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:23 AM2018-03-30T03:23:53+5:302018-03-30T03:23:53+5:30
पुणे शहरात विशेषत: उपनगरांमध्ये होणाऱ्या घरफोडीचे सत्र चालू असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे़
पुणे/धनकवडी : पुणे शहरात विशेषत: उपनगरांमध्ये होणाऱ्या घरफोडीचे सत्र चालू असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे़ नागरिकांची घरे, दुकाने फोडली जाऊन लाखो रुपयांचा ऐवज चोरटे लंपास करताना दिसून येत आहे़ कात्रज व आंबेगाव बु. परिसरातील दोन वेगवेगळ्या सोसायट्यांमधील एकूण ७ फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केल्याच्या घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्या आहेत. चोरी करण्यासाठी चोरटे मोटारीतून आल्याचे निष्पन्न झाले आहे़
याप्रकरणी विनायक लालासाहेब जाधव (वय ४६, रा़ चंद्राई कॉम्प्लेक्स, आंबेगाव बु.) व धीरज जीवरामभाई धांडालिया (वय २५, रा़ तोरणा क्लासिक, नारायणी धाम) या दोघांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
धीरज जीवरामभाई धांडालिया हे तोरणा क्लासिक इमारतीतील फ्लॅट क्रमांक सी १० मध्ये राहण्यास आहेत. चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट फोडून त्यातील एक कुलर व रोख रक्कम असा १० हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला़
या इमारतीत चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे मोटारीतून आल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात
निष्पन्न झाले आहे. तर याच इमारतीतील आणखी तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. परंतु, फ्लॅटधारक हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या फ्लॅटमधून
नेमके काय चोरीला गेले, याची माहिती अद्याप पोलिसांना माहिती मिळाली नाही़
४पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक जाधव हे धायरी येथील घरी गेले होते़ त्यांचा फ्लॅट कुलुप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलुप उचकटून त्यांच्या घरात प्रवेश करुन १० तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख असा १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. जाधव यांच्या इमारतीतील तिसºया मजल्यावरील सुधीरसिंग दलबीरसिंग राणा यांचा फ्लॅट फोडून ५० हजार रुपये रोख, एक कॅमेरा व कॅमेºयाची लेन्स असा माल चोरून नेला़ तसेच ज्ञानराज सखाराम तळेकर यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या इमारतीतील तीन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.