गावठी कट्ट्यासह दोन चोरटे जेरबंद

By admin | Published: January 7, 2016 01:34 AM2016-01-07T01:34:18+5:302016-01-07T01:34:18+5:30

लोकलची वाट पाहत थांबलेल्या दाम्पत्यास पिस्तूलचा धाक दाखवून २६ हजारांचा ऐवज लुबाडून नेणाऱ्या तीनपैकी दोन चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी

Two stolen robbers along with a cloth cut | गावठी कट्ट्यासह दोन चोरटे जेरबंद

गावठी कट्ट्यासह दोन चोरटे जेरबंद

Next

पिंपरी : लोकलची वाट पाहत थांबलेल्या दाम्पत्यास पिस्तूलचा धाक दाखवून २६ हजारांचा ऐवज लुबाडून नेणाऱ्या तीनपैकी दोन चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत शिताफीने पकडले. पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील पुलाखाली सापळा रचून एकाला, तर दुसऱ्या चोरट्याला मंचरजवळील बावडी येथे ताब्यात घेतले. एक जण मात्र फरार झाला.
आकुर्डीत लुबाडणूक केलेल्या एका चोरट्यास फिर्यादीने ओळखले. त्यानुसार त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी सापळा रचून पिंपरी पुलाखाली चोरट्यांना ताब्यात घेतले. सलीम ऊर्फ कांचा सत्तार शेख (वय ३३, रा. गांधीनगर, देहूरोड) या आरोपीला ४ जानेवारीला अटक केली. त्याच्याकडून दोन साथीदारांची माहिती मिळाली. संतोष पोपट ननावरे (वय २५, रा. जातेगाव, शिरूर), सोन्या अरविंद जगताप या दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे त्याच्याकडून निष्पन्न झाले. त्यातील संतोष ननावरे या आरोपीलाही अटक केली. सोन्या अरविंद जगताप हा आरोपी मात्र फरार झाला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Two stolen robbers along with a cloth cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.