जागतिक महिला दिनाच्या औचित्याला दोन विद्यार्थिनी जागतिक विक्रमासाठी लावणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 09:42 PM2018-03-06T21:42:49+5:302018-03-06T21:42:49+5:30

 पुणे: पौड इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे गावाची सुकन्या वैष्णवी मांडेकर व पुणे महानगरातील अस्मिता जोशी या दोघी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाल्या आहेत.

two students made World record Women's Day | जागतिक महिला दिनाच्या औचित्याला दोन विद्यार्थिनी जागतिक विक्रमासाठी लावणार कस

जागतिक महिला दिनाच्या औचित्याला दोन विद्यार्थिनी जागतिक विक्रमासाठी लावणार कस

Next
ठळक मुद्देएकावेळी दोघी खिळ्यांच्या दोन फळ्यांमध्ये झोपून अत्यंत कमी वेळेत १ हजार किलो फरशा फोडून घेणार आहेवैष्णवी व अस्मिता या दोन महाविद्यालयीन युवती या नव्या विक्रमासाठी गेली सहा महिने अथक परिश्रम घेत आहेत. 

 पुणे: पौड इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे गावाची सुकन्या वैष्णवी मांडेकर व पुणे महानगरातील अस्मिता जोशी या दोघी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना इंटरनॅशनल मार्शल आर्टस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी व कराटेचे प्रशिक्षक विक्रम मराठे यांनी सांगितले, की वैष्णवी व अस्मिता या दोघी गेली दहा वर्षांपासून आमच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून येत्या ८ मार्च रोजी आतापर्यंत कोणीही न दाखवलेलं धाडस दाखवून एक जागतिक विक्रम करण्याच्या तयारीत आहे.
     या साहसी खेळाच्या प्रात्यक्षिकाचा थरार अनुभवण्यासाठी अधिकाधिक प्रेक्षकांनी गुरुवार ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील व खेळाडू वैष्णवी मांडेकरचे वडील दादाराम मांडेकर यांनी केले आहे. वैष्णवी मांडेकर ही ६ इंच लांबी असलेल्या खिळ्यांच्या फळ्यांमध्ये सँडविचसारखी मधोमध झोपलेली असेल आणि तिच्यावर अस्मिता जोशी एक  ६ इंच लांबीच्या खिळ्यांची फळी व वर छातीवर फरशामध्ये सँडविच असेल. छातीवर ठेवलेल्या शहाबाद फरशा १८ एलबीएसच्या हातोडीने शिहान विक्रम मराठे कमीत कमी वेळात फोडणार आहेत. यापूर्वी ८ मार्च २०१५ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या असोसिएशनच्या ४ विद्यार्थिनी प्रत्येकीने खिळ्यांच्या फळीवर पाठीवर झोपून व्यक्तिगत एक हजार किलो फरशा अंगावर फोडून घेतल्या होत्या. त्याची २०१६ च्या लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. 
यावेळी एकावेळी दोघी खिळ्यांच्या दोन फळ्यांमध्ये झोपून अत्यंत कमी वेळेत १ हजार किलो फरशा फोडून घेणार आहे. वैष्णवी व अस्मिता या दोन महाविद्यालयीन युवती या नव्या विक्रमासाठी गेली सहा महिने अथक परिश्रम घेत आहेत. 
आम्ही या नव्या विक्रमासाठी पूर्णपणे सज्ज असून आम्हालाही जागतिक विक्रमाची उत्सुकता लागली आहे. हा विक्रम प्रस्थापित करून सामान्य महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यात आमची मदत या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणार असल्याची प्रतिक्रिया दोघींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

,....................................

Web Title: two students made World record Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.