बारामतीत एकाच दिवशी दोन उपजिल्हा रुग्णालय मंजूर, चाकण मध्ये एकही का नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:48+5:302021-07-08T04:09:48+5:30
चाकण औद्योगिक वसाहत, सेझ प्रकल्प आदी भागातून पुणे ग्रामीणमधून राज्य शासनाला सर्वात जास्त कर खेड तालुक्यातुन मिळत आहे. वाढत्या ...
चाकण औद्योगिक वसाहत, सेझ प्रकल्प आदी भागातून पुणे ग्रामीणमधून राज्य शासनाला सर्वात जास्त कर खेड तालुक्यातुन मिळत आहे. वाढत्या औद्योगिकरणाने मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत नागरिकांना आरोग्य सेवा चांगल्या मिळाव्यात यासाठी चाकण उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव अंदाजे ७२ कोटीचा जून २० मध्ये दुबार शासनास सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाला या प्रस्तावाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. परंतु बारामती तालुक्यातील रुई व सुपा ग्रामीण रुग्णालये १०० बेडमध्ये रूपांतरित करीत उपजिल्हा रुग्णालय अवघ्या ४० दिवसात खासबाब म्हणून शासन निर्णय होऊन मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड म्हणाले की, चाकण उपजिल्हा रुग्णालय प्रस्ताव का प्रलंबित ठेवला याची वस्तुस्थिती तरी सांगावी आणि जमलं तर आमच्या प्रस्तावाला देखील विशेष बाब निकषात घेऊन मंजूर करावे, जागा उपलब्ध आहे निकष सर्व पुर्तता आहे मग मान्यता द्यायला काय अडचण आहे.
वास्तविक पाहता २०१४ पासून काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चाकण, आळंदी व राजगुरुनगर उपजिल्हा रुग्णालय प्रस्ताव करण्याचे निर्देश दिले होते. खेड तालुक्यात आळंदी, चाकण व राजगुरुनगर ग्रामीण रुग्णालये श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालयामध्ये तालुक्यातील औद्योगिकीकरण, नागरीकरणासह आदिवासी भाग या कारणाने झाले पाहिजे. परंतु शासनास प्रशासनाने मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण ग्रामीण रुग्णालय तरी श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय १०० बेडमध्ये व्हावे, यासाठी प्रस्ताव दोनदा पाठवले, ते अद्याप शासनाकडून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. तरी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून खेड तालुक्यावरील अन्याय दूर करावा अशी जनमागणी होत आहे.
--
कोट
चाकण उपजिल्हा प्रस्ताव मागील सात वर्ष प्रलंबित आहे. सर्व निकष पुर्तता करणारा प्रस्ताव दोनदा शासनास दिला तथापि प्राधान्यक्रम सोडून मागील प्रस्ताव विशेष बाब नावाखाली मंजूर करून आमच्या तालुक्याचे प्रस्ताव मागे पडले. खेड तालुक्यात माणसं राहत नाही का? आज कोरोनात खेड तालुका सर्वात जास्त बाधित आहे,आता प्रस्ताव आठ दिवसात मंजूर न केल्यास मात्र न्यायालयात दाद मागितली जाईल. -निलेश कड पाटील, प्रवक्ता जिल्हा काँग्रेस.
--------------------------------------------------------
फोटो क्रमांक : ०७चाकण रुग्णालय
फोटो - चाकण ग्रामीण रुग्णालय.
070721\07pun_17_07072021_6.jpg
फोटो क्रमांक : ०७चाकण रुग्णालयफोटो - चाकण ग्रामीण रुग्णालय.