सुपेत दोन, तर लोणीत एक डेंग्यूचा रुग्ण

By admin | Published: October 6, 2014 06:44 AM2014-10-06T06:44:08+5:302014-10-06T06:44:08+5:30

बारामती तालुक्यातील सुपे येथील तलावानजीक असणाऱ्या ननवरे वस्तीवर डेग्यूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Two of the superiors, one dengue sufferer in butter | सुपेत दोन, तर लोणीत एक डेंग्यूचा रुग्ण

सुपेत दोन, तर लोणीत एक डेंग्यूचा रुग्ण

Next

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील तलावानजीक असणाऱ्या ननवरे वस्तीवर डेग्यूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मागील आठवड्यात पानसरेवाडी अंतर्गत असणाऱ्या गदादेवस्तीवर डेंग्युचा रुग्ण आढळुन आला होता. त्यानंतर सुपे तलावानजीक असणाऱ्या ननवरे वस्तीवर डेंग्युचे दोन रुग्ण आढळुन आले आहेत. या दोघांना उपचारासाठी डॉ. साळुंके यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या असता दोघे जण डेंग्यु पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीत आढळुन आले आहे. मात्र, हे दोघे कामानिमित्ताने दररोज चौफुला येथे जात असल्याची माहिती डॉ. साळुंके यांनी दिली. तसेच काळखैरेवाडी आणि पुरंधर तालुक्यातील राजुरी येथील रुग्णाला डेंग्यु सदृश्य लागण झाली आहे. मागील आठवड्यातील डेंग्युच्या रुग्णाला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. साळुंके यांनी दिली.
सुप्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या ओढ्याचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या दूषित पाण्यामुळे मलेरीया आणि विषमज्वर आदी रोगांच्या प्रमाणात वाढ होत आहे. ओढ स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील प्रभाग क्र. ४ मध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना या दूषित पाण्याचा जास्त त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Two of the superiors, one dengue sufferer in butter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.