गारवा हॉटेल मालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी जप्त, महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:04 PM2021-07-28T22:04:00+5:302021-07-28T22:04:16+5:30

या हत्येत सहभागी असलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे. 

Two swords used in Garwa hotel owner's murder seized, woman arrested | गारवा हॉटेल मालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी जप्त, महिलेला अटक

गारवा हॉटेल मालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी जप्त, महिलेला अटक

Next

लोणी काळभोर : व्यावसायिक वैमन्यस्यातून झालेल्या उरुळी कांचन ( ता हवेली ) येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेल्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी लपवून ठेवल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. यामुळे या हत्येत सहभागी असलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे. 

याप्रकरणी काजल चंद्रकांत कोकणे ( वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे ) ला अटक करण्यात आली आहे ) यापुर्वी हडपसर परिसरातील १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांसह निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ), बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली ), निखिल मंगेश चौधरी ( वय २० ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन, ता. हवेली ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा.सोरतापवाडी, ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता दौंड ) व सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा खेडेकर मळा ता हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे. 

रविवारी रात्री ८ - ४५ वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे ( वय , रा.जावजीबुवाची वाडी ता.दौंड ) हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना डोके, हात व पायावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. उपचार चालु असताना त्यांचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडे यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन तलवारी आणल्या होत्या. प्रत्यक्षात एकच वापरण्यात आली. अल्पवयीन मुलाने आखाडे यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केलेनंतर तो व निलेश आरते हे दोघे दुचाकीवरून काजलकडे गेले. व दोन्ही तलवारी तिच्या ताब्यात दिल्या. तिने त्या लपवून ठेवल्या. काजल ही आरते याची पत्नी असल्याची माहिती पुढे येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष काळे हे करत आहेत. 

Web Title: Two swords used in Garwa hotel owner's murder seized, woman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.