पुलाचे लोखंडी पाईप भंगारात विकणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:13+5:302021-04-27T04:11:13+5:30

या प्रकरणी मंचर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. सुनील दिलीप पवार व विशाल सखाराम किर्वे (दोघे रा. निरगुडसर) ...

Two thieves arrested for selling iron pipe scrap of a bridge | पुलाचे लोखंडी पाईप भंगारात विकणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

पुलाचे लोखंडी पाईप भंगारात विकणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

Next

या प्रकरणी मंचर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सुनील दिलीप पवार व विशाल सखाराम किर्वे (दोघे रा. निरगुडसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पादचारी जुन्या पुलाचे एका बाजूचे सर्व लोखंडी पाईप चोरट्यांनी चोरून नेले होते. सतत होणाऱ्या चोरीमुळे जवळे व निरगुडसरचे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. काही गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पुलाच्या परिसरात पाळत ठेवण्याचे काम केल्यामुळे चोरटे गावकऱ्यांच्या जाळ्यात अडकले.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १९) रात्री ९ च्या सुमारास निरगुडसर गावाच्या हद्दीत असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे लोखंडी पाईप तोडल्याचा आवाज जवळे येथील युवराज खालकर यांना आला. त्यांनी निरगुडसरच्या ग्रामस्थांना सदर माहिती कळविली. पोलीस पाटील विठ्ठल वळसे पाटील, निरगुडसरचे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज हांडे, माजी उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे यांनी पुलाजवळ येऊन पाहणी केली. त्या वेळी त्यांना सुनील पवार व विशाल किर्वे हे मोटरसायकलवरुन लोखंडी पाईप व अँगल पारगाव येथील भंगार दुकानात विकण्यासाठी घेऊन गेले असल्याचे समजले. हांडे व टाव्हरे यांनी पारगाव येथील भंगार दुकानात जाऊन पाहणी केली. अँगल व पाईप पुलाचे असल्याचे आढळून आले. पाईप चोरणारे चोरटे गाडी व पाईप टाकून पळून गेले होते. मंचर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर व ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन पंचनामा केला आहे. चोरट्यांनी १ हजार ८०० रुपये किमतीचे लोखंड चोरुन नेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस पाटील विठ्ठल वळसे पाटील यांनी पवार व किर्वे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर करत आहे.

Web Title: Two thieves arrested for selling iron pipe scrap of a bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.