पुणोकरांचे दोनवेळ पाणी तूर्तास कायम

By admin | Published: October 12, 2014 12:01 AM2014-10-12T00:01:13+5:302014-10-12T00:01:13+5:30

शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांमधील पाणी शहराला पिण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सिंचनासाठी राखीव ठेवण्यासाठी होणारी कालवा समितीची बैठक विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

Two times the water of Punokar remained under water | पुणोकरांचे दोनवेळ पाणी तूर्तास कायम

पुणोकरांचे दोनवेळ पाणी तूर्तास कायम

Next
>पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांमधील पाणी शहराला पिण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सिंचनासाठी राखीव ठेवण्यासाठी होणारी कालवा समितीची बैठक विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या स्थापनेनंतरच ही बैठक होणार असल्याने पुणोकरांना तूर्तास दोनवेळ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑक्टोबर महिन्यात होणा:या कालवा समितीच्या बैठकीत धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठय़ानुसार, शेतीला किती आणि शहरासाठी किती पाणी शिल्लक ठेवण्यात येणार याबाबत निर्णय घेतल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठय़ाचा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, दर वर्षीप्रमाणो 15 ऑक्टोबर रोजी ही बैठक होण्याची शक्यता होती. मात्र, याच दिवशी विधानसभेच्या निवडणुका असल्याने ही बैठक पुढे ढकलली जाणार आहे. तसेच हा पाणीवाटपाचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत घेतला जात असल्याने नवीन सरकारच्या स्थापनेनंतरच ही बैठक होणार आहे, त्यामुळे ही बैठक होईर्पयत पाणीकपात करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.      (प्रतिनिधी)
 
धरणांमध्ये 
98 टक्के पाणीसाठा 
शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांमध्ये आजअखेर 98 टक्के पाणीसाठा कायम आहे. खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, टेमघर आणि पानशेत धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा असून खडकवासला धरणात 73 टक्के पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. तर कालव्याद्वारे खडकवासला धरणातून सुमारे 364  क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तसेच या चारही धरणांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पाणीसाठय़ात किंचित वाढ 
झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Two times the water of Punokar remained under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.