थांबलेल्या पीएमपी बसचे दोन टायर फुटले, दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 08:56 PM2018-03-28T20:56:20+5:302018-03-28T20:56:20+5:30
भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात.
कात्रज : विद्यार्थी घेण्यासाठी कात्रज चौकात थांबलेल्या पीएमपी बसच्या मागचे दोन टायर फुटल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत १७ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. उपचारानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. पीएमपी बसच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दैैवबलवत्तर म्हणून दुर्घटना टळली. मात्र, पीएमच्या बसच्या सुरक्षितेतवर पुन्हा एकदा या घटनेने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात. अशाच विद्यार्थ्याँना घेवून जाणारी बस कात्रज येथे बस थांबली असताना अचानक मोठा आवाज आला. बसला धुळीने घेरले. मोठ्या आवाजामुळे बसकडे धावलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांना बस बाहेर काढले. बसच्या मागचे दोन टायर एकाचवेळी फुटल्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना हाताला, पायाला, डोक्याला, कमरेला मुका मार लागला होता. अशा सर्वांची आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्याँना घरी सोडण्यात आले. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दुर्घटना टळली असली तरी याचा पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे निवेदन महापालिका शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी पीएमपी आगाराला दिले आहे.
-------------------------------------------