पुण्याहून एर्नाकुलमसाठी आता दोन रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:04+5:302021-09-18T04:11:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे - एर्नाकुलम ही रेल्वे सुरु करण्याचा निर्णय ...

Two trains will now run from Pune to Ernakulam | पुण्याहून एर्नाकुलमसाठी आता दोन रेल्वे धावणार

पुण्याहून एर्नाकुलमसाठी आता दोन रेल्वे धावणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे - एर्नाकुलम ही रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला. पुणे - एर्नाकुलमसाठी दोन रेल्वे धावणार आहेत. दोन्हींचा मार्ग वेगळा असल्याने दोन्ही मार्गांवरच्या प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे कोकण व गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

१. पुणे - एर्नाकुलम साप्ताहिक विशेष

01197 साप्ताहिक विशेष २५ सप्टेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत दर शनिवारी १० वाजून १० मिनिटांनी पुण्याहून सुटेल. एर्नाकुलम येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३.२० मिनिटांनी वाजता पोहोचेल.

01198 साप्ताहिक विशेष एर्नाकुलम येथून २७ सप्टेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत दर सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. ही मिरजमार्गे धावेल. गाडीला बेळगाव, लोंढा, मडगाव, गोकर्ण रोड, मंगळुरूमार्गे एर्नाकुलम येथे पोहोचेल.

२. पुणे-एर्नाकुलम ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावेल.

गाडी क्रमांक 01150 पुणे - एर्नाकुलम ही २९ सप्टेंबरपासून दर रविवारी आणि बुधवारी पुणे येथून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. एर्नाकुलमला दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल.

01149 एर्नाकुलम - पुणे १ ऑक्टोबरपासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी एर्नाकुलम येथून पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. ही गाडी व्हाया पनवेलमार्गे धावेल. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, मडगाव आदी स्थानकांवर थांबेल.

Web Title: Two trains will now run from Pune to Ernakulam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.