Pune: वाडागाव-डिंग्रजवाडी रोडवर दुचाकींची समाेरासमोर धडक; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 11:09 IST2023-06-07T11:07:27+5:302023-06-07T11:09:24+5:30
दुचाकीहून जात असताना भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची धडक...

Pune: वाडागाव-डिंग्रजवाडी रोडवर दुचाकींची समाेरासमोर धडक; दोघांचा मृत्यू
कोरेगाव भीमा (पुणे) : वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथील वाडागाव- डिंग्रजवाडी रस्त्यावरून दुचाकीहून जात असताना भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची धडक बसून महादेव दत्तात्रय कांबळे (वय १४, रा. पंढरीनाथनगर, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) व सिद्धेश शिंदे (वय १७) या दोघांचा मृत्यू तर ओंकार चंद्रकांत कंदारे हा युवक जखमी झाल्याची घटना घडली असून या अपघातात ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व अमोल महादेव कांबळे (वय ३३, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथील वाडागाव- डिंग्रजवाडी रस्त्यावरून महादेव कांबळे व सिद्धेश शिंदे हे दोघे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच १२ जीपी २०३६) ने जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ओंकार कंदारे हा युवकाच्या दुचाकीची धडक बसून महादेव कांबळे यांच्या दुचाकीला अपघात झाला.
यावेळी महादेव दत्तात्रय कांबळे याचा जागीच मृत्यू झाला, तर सिद्धेश बाळासाहेब शिंदे याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ओंकार चंद्रकांत कंदारे (रा. वाडागाव, ता. शिरूर, जि. पुणे) हा जखमी झाले असून शिक्रापूर पोलिसांनी ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहेत.