Accident: दुचाकीला अवजड वाहनाची धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:07 PM2022-02-18T19:07:06+5:302022-02-18T19:07:21+5:30

कॉलेजहून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

two wheeler hit by heavy vehicle the unfortunate death of two students in an accident in chakan shikrapur highway | Accident: दुचाकीला अवजड वाहनाची धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Accident: दुचाकीला अवजड वाहनाची धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Next

शेलपिंपळगाव : कॉलेजहून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तन्मय पंकज हरगुडे (वय १८ रा. साबळेवाडी ता. खेड) व ओंकार कैलास साबळे (वय १८ रा. बहुळ ता. खेड) असे अपघातातमृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेने साबळेवाडी व बहुळ परिसरात शोककळा पसरली आहे.

सदरचा अपघात चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील कडाचीवाडी हद्दीत सायंकाळी तीनच्या सुमारास झाला. तन्मय व ओंकार कॉलेजहून आपल्या दुचाकीने  घरी जात होते. मात्र कडाचीवाडी हद्दीत पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी स्थानिक तरूणांनी धाव घेऊन नातेवाईकांच्या मदतीने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तन्मयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
            
तन्मयच्या पाठीमागे आजी - आजोबा, आई - वडील, भाऊ, चुलते, नातेवाईक असा परिवार आहे. बहुळ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन पंकजबाप्पू हरगुडे यांचे ते चिरंजीव होते. तर ओंकार हा सामाजिक कार्यकर्ते कैलास बाजीराव साबळे यांचा ते पुत्र होत. 

 

Web Title: two wheeler hit by heavy vehicle the unfortunate death of two students in an accident in chakan shikrapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.