बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 04:00 AM2020-11-30T04:00:29+5:302020-11-30T04:00:29+5:30
\Sपुणे/धायरी : पीएमपी बसची धडक बसून झालेल्य अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जयंत रामजी महाडिक (वय ६७, रा. नांदेडगाव) असे ...
\Sपुणे/धायरी : पीएमपी बसची धडक बसून झालेल्य अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
जयंत रामजी महाडिक (वय ६७, रा. नांदेडगाव) असे मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात सिंहगड रोडवरील संतोष हॉल चौकाजवळ रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला.
पीएमपी बस स्वारगेटकडून नर्हेकडे चालली होती. संतोष हॉल चौकाजवळील जगताप हॉस्पिटलसमोर बस आली असताना बसच्या पाठीमागील बाजूचा दुचाकीला धक्का लागला. दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला जोराचा मार लागला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जयंत महाडिक हे खासगी संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. सिंहगड रोड पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
बसच्या पाठीमागील चाकाखाली अडकून महाडिक यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हेल्मेट असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, सर्व दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.