Pune | चासमध्ये दोन महिलांवर तरसाचा हल्ला; ४ तासानंतर वनविभागाला तरसाला पकडण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 03:35 PM2023-03-24T15:35:22+5:302023-03-24T15:36:02+5:30

मक्याच्या शेताच्या कडेला जाळी लाऊन तरसला पकडण्यात वनविभागाला यश...

Two women attacked by lust in Chas; After 4 hours, forest department succeeded in catching Tarsala | Pune | चासमध्ये दोन महिलांवर तरसाचा हल्ला; ४ तासानंतर वनविभागाला तरसाला पकडण्यात यश

Pune | चासमध्ये दोन महिलांवर तरसाचा हल्ला; ४ तासानंतर वनविभागाला तरसाला पकडण्यात यश

googlenewsNext

अवसरी (पुणे) : चास (ता. आंबेगाव) येथील चिखलदरा परिसरात तरसाने शारदा वसंत बनकर (वय ४०) व मेघा प्रवीण बनकर (वय २३) या दोन महिलांवर हल्ला केला. त्यात त्या खाली पडल्याने किरकोळ जखमी झाल्या. ही घटना शुक्रवार (ता.२४) रोजी सकाळी  घडली. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर  वनविभागाला तरसाला पकडण्यात यश आले. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.

चिखलदरा येथे सकाळी ८ वाजता मनोज बारवे यांनी तरसाला पाहिले. एकनाथ देवराम बारवे यांच्या गाई गोठ्यात तरस घुसण्याचा प्रयत्न करत होते. कुत्र्यांनी प्रतिकार केल्याने तेथून जवळच असलेल्या निजाम इनामदार यांच्या पोल्ट्री शेडकडे तरस गेला. तेथे जवळपास दीड ते दोन तास तरस बसले होते. शारदा बनकर व मेघा बनकर या सासू सुना गोठ्याकडे जात होत्या. त्यावेळी अचानकपणे तरसाने पोल्ट्री शेडजवळ दोघींवर हल्ला केला.

त्यावेळी डोक्यावरील प्लास्टिकचे घमेले खाली पडले. ते घमेलेही तरसाने फोडून टाकले आहे. त्यांनी केलेला आरडाओरड ऐकून आजुबाजुस काम करत असलेले शेतकरी मनोज बारवे, हरिभाऊ कढणे, राहुल कढणे, बन्सी शेगर, शरद बारवे व अन्य नागरिक मदतीसाठी धावून आले. दोघी खाली पडल्याने त्यांना किरकोळ जखमी झाल्या. त्याच्यावरही तरस गुरगुरत होते. नागरिकांनी हुसकावल्यानंतर मक्याच्या शेतात ते पळून गेले. तेथे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घडलेल्या घटनेची माहिती मनोज बारवे यांनी वनविभागाला दिली. वनरक्षक रईस मोमीन यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनरक्षक मोमीन, माणिकडोह येथील डॉ. अखिलेश ढगे, महेंद्र ढोरे, कुणाल घुले व तन्मय बागल हे पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मक्याच्या शेताच्या कडेला जाळी लाऊन तरसला पकडण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर परिरसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Two women attacked by lust in Chas; After 4 hours, forest department succeeded in catching Tarsala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.