नोकरीच्या आमिषाने दोन महिलांना सहा लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:55+5:302021-07-22T04:08:55+5:30
पुणे : नोकरीच्या आमिषाने दोन महिलांना सहा लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वाघोली परिसरातील एका ...
पुणे : नोकरीच्या आमिषाने दोन महिलांना सहा लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत वाघोली परिसरातील एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी या महिलेच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. चोरट्यांनी महिलेला एका बड्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी नोकरीविषयक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. महिलेकडे वेगवेगळ्या प्रकारची बतावणी करून महिलेला बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा करण्यास सांगून महिलेची एकूण मिळून ४ लाख ५१ हजार ५०४ रुपयांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ तपास करत आहेत.
वानवडी भागातील एका युवतीची नोकरीच्या आमिषाने १ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. या युवतीने काही दिवसांपूर्वी साेशल मिडियावर एक जाहीरात पाहिली होती. जाहीरातीतील मोबाइल क्रमांकावर युवतीने संपर्क साधला. त्यानंतर चोरट्याने युवतीकडे ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची विक्री केल्यास भरपूर नफा होईल, असे आमिष दाखविले होते. युवतीला एका बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी पैसे पाठविण्यास सांगितले. युवतीकडून वेळोवेळी पैसे उकळले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.