पिकअप जीप-मोटार अपघातात २ महिला जखमी

By Admin | Published: December 24, 2016 12:12 AM2016-12-24T00:12:19+5:302016-12-24T00:12:19+5:30

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात शुक्रवारी (दि. २३) सकाळी साडेसातच्या वेळेला मालवाहू पिकअप जीपने मोटारीला

Two women injured in pick-up jeep-motor accident | पिकअप जीप-मोटार अपघातात २ महिला जखमी

पिकअप जीप-मोटार अपघातात २ महिला जखमी

googlenewsNext

आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात शुक्रवारी (दि. २३) सकाळी साडेसातच्या वेळेला मालवाहू पिकअप जीपने मोटारीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली.
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे बाजूने नाशिकला जाणाऱ्या मोटारीला (एमएच १४ बीआर ६९२४) आळेफाटा परिसरातील खापरेवस्ती येथे नाशिक बाजूने पुणेकडे जाणाऱ्या पिक-अप जीपने वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत धडक दिली. या अपघातात मोटारीमधील प्रमिला महाजन (वय ५५) व वैशाली दीपक महाजन (वय ३०, दोघीही रा. वाकड) या जखमी झाल्या. ग्रामस्थांनी जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Two women injured in pick-up jeep-motor accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.