शिक्षकाचे विद्यार्थिनींशी दोन वर्षे अश्लील वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 08:38 AM2016-03-16T08:38:14+5:302016-03-16T08:38:14+5:30

विद्यार्थिनींनी विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत... विद्यालयातून काढून टाकू... तुमचीच बदनामी करू... त्यासाठी सहलीचे सेल्फी फोटो वापरू..

Two years of pornography with teachers' female students | शिक्षकाचे विद्यार्थिनींशी दोन वर्षे अश्लील वर्तन

शिक्षकाचे विद्यार्थिनींशी दोन वर्षे अश्लील वर्तन

Next

चाकण : विद्यार्थिनींनी विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत... विद्यालयातून काढून टाकू... तुमचीच बदनामी करू... त्यासाठी सहलीचे सेल्फी फोटो वापरू... अशा धमक्या देऊन गेली २ वर्षे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाचे धक्कादायक प्रताप समोर आले आहेत.
चाकणजवळील वाकी (ता. खेड) हद्दीतील एका इंग्रजी मध्यमाच्या प्रशालेत हा प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींशी अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील चाळे तो करीत असे. संबंधित प्रशालेच्या एककल्ली कारभारामुळे तक्रारी करण्यास विद्यार्थिनी धजत नव्हत्या. या २६ वर्षीय शिक्षकाचा छळ ‘त्या’ निमूटपणे सहन करीत होत्या. एका विद्यार्थिनीने त्याच्याविरोधात पालकांकडे तक्रार केल्यानंतर संपूर्ण प्रशालेत हा प्रकार पसरल्या आणि त्याला वाचा फुटली.
एकीकडे स्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात असताना उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. त्यातच संबंधित शिक्षकाच्या संदर्भात प्रशालेच्या प्रशासनाने सुरुवातीला बोटचेपेपाणाचे धोरण घेतल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे : एका विद्यार्थिनीने या प्रकाराबाबत पालकांना सांगितल्यानंतर काही पालकांनी सोमवारी सकाळी त्याची चाकण पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस अधिकारी आणि संबंधित काही पालक प्रशालेत आले. या प्रकाराची कुणकुण लागताच संबंधित प्रशालेच्या प्रशासनाने संबंधित पालकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. ‘आम्हाला प्रथम सांगायला हवे होते. थेट पोलिसांत गेलात... आता याचा परिणाम भोगावा लागेल,’ असे त्यांनी संबंधितांना दटावले. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशालेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींशी संवाद साधून विचारपूस केली असता, हा शिक्षक विद्यार्थिनींशी लगट करणे, अत्यंत अश्लील प्रश्न विचारणे, विद्यार्थिनींना घरी फोन करणे व अनेक बीभत्स प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले.

प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर ‘पोलीस कारवाई करू नका, संबंधित शिक्षकाला तातडीने बडतर्फ करण्याचे आश्वासन’ त्यांनी दिले. दरम्यानच्या काळात इयत्ता आठवीमधील काही विद्यार्थिनी हीच तक्रार घेऊन पोलीस व प्रशासनाच्या समोर आल्या. त्यानंतर संबंधित प्रशासन व पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीला कबूल न झालेल्या संबंधित शिक्षकाने नंतर आपल्या कुकर्मांचा पाढा वाचला.

संबंधित प्रशालेच्या प्रशासनाने त्या नराधम शिक्षकाला तत्काळ बडतर्फ करणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात विद्यार्थिनींना पोलिसी कारवाईचा आणखी मनस्ताप नको, अशी भूमिका घेऊन संबंधित प्रशालेच्या दबावाने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे धारिष्ट कोणत्याही पालकांनी दाखविले नाही. मात्र, बालवयातील विद्यार्थिनींबाबत घडलेल्या या प्रकाराचा तीव्र निषेध सर्वच स्तरांतून होत आहे.

Web Title: Two years of pornography with teachers' female students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.