Pune: टाटा धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू; शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 09:24 AM2023-10-09T09:24:44+5:302023-10-09T09:25:29+5:30
पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना रविवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान घडली....
लोणावळा (पुणे) : लोणावळ्यातील टाटा धरणात बुडाल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. दोन युवकांचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाला यश आले. पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना रविवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान घडली.
विवेक छत्री (वय २१, रा. ओळकाईवाडी), करण कुंवर (२०, या. ओळकाईवाडी) अशी या पाण्यात बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. परेश भूल (१८, रा. ओळकाईवाडी) याने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली.
धरणात मुले बुडाल्याची माहिती समजताच शिवदुर्गचे अजय शेलार, महेश म्हसणे, सागर कुंभार, मनोहर ढाकोळ, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, ब्रिजेश ठाकूर, मयूर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दीपांशू तिवारी यांच्या पथकाने टाटा धरणाच्या मुले बुडाल्याच्या ठिकाणी जाऊन पाण्यात तत्काळ शोधमोहीम राबवत मुलांना बाहेर काढले. मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल व पोलिस पथकही दाखल झाले होते.