कामगार आयुक्तालयातील टंकलेखकानेच घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:16+5:302020-12-25T04:11:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कामागर आयुक्तालयात लेबर लायसेन्स काढण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाला तेथील टंकलेखक व टेंडर कन्सल्टंट यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कामागर आयुक्तालयात लेबर लायसेन्स काढण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाला तेथील टंकलेखक व टेंडर कन्सल्टंट यांनी संगनमत करुन बनावट लेबर लायसन्स देऊन तब्बल १ लाख रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी टंकलेखक रविकांत चंद्रकांत वाघेला (वय ३२) आणि टेन्डर कन्सल्टंट सचिन मुरलीधर नगरकर (वय ३०, रा. बहिरट पाटील कॉम्पलेक्स, शिवाजीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विनोद शेळके (वय ३०, रा. आंबेगाव पठार) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली. विनोद शेळके हे कामगार आयुक्तालयात लेबर लायसन्स काढण्यासाठी गेले होते. तेव्हा वाघेला व नगरकर यांनी लेबर लायसन्स काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून १ लाख रुपये घेतले. नंदिनी एंटरप्रायजेस या नावाने लेबर लायसेन्स काढून देऊन असे सांगितले. त्यातील ८३ हजार ५४६ रुपये शासनास भरलेली नोंद असलेले बनावट लेबर लायसन्स देऊन शासनास ही रक्कम न भरता अपहार करुन शासनाची फसवणूक केली.