महामार्गावरील यू टर्न बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:23 PM2018-12-20T23:23:23+5:302018-12-20T23:23:34+5:30
पुणे-सोलापूर महामार्ग : गतिरोधकाची मागणी
पळसदेव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज क्र. २ येथील ‘यू टर्न’ मृत्यूचा सापळा बनला आहे. दोन्ही रस्त्यांमध्ये अपुरी जागा व भरधाव वाहने यांमुळे सतत अपघात होत आहेत. या ठिकाणी अअपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बांधण्याची मागणी लोकांनी केली आहे.
येथील यु टर्न हा चौकासारखा आहे. येथून वळताना मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने या कामी लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणाहून रस्ता ओलांडून जाणे सुध्दा जिकरीचे काम बनले आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत जावे लागते. पुणे बाजूकडून येणारी वाहने वालचंदनगरकडे जाण्यासाठी या ठिकाणी ‘टर्न ह्यघेतात. त्याच वेळी अंदाज न आल्यास अपघात होतात. त्यातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या ठिकाणी वाहन वळताना ‘स्पेस’ कमी आहे. त्यामुळे वाहने उभी राहिल्यास दोन्ही बाजूंनी वाहने धडकण्याची भीती असते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी लोकांनी, प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे लक्ष देणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.