उदापूरला बिबट्याची दहशत
By admin | Published: February 27, 2015 11:50 PM2015-02-27T23:50:44+5:302015-02-27T23:50:44+5:30
जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच असून, उदापूर परिसरात दहशत माजवली आहे. गुरुवारी रात्री ९च्या सुमारास गोठ्यातील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने
मढ : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच असून, उदापूर परिसरात दहशत माजवली आहे. गुरुवारी रात्री ९च्या सुमारास गोठ्यातील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. एका बोकडाच्या नरडीचा घोट घेतला तर एका शेळीस पळवून नेले.
शेळ्यांचा आवाज येत असल्याने सुतार आळीतील मुरलीधर रामभाऊ शिंदे यांना बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड करून हुसकावले असता, तो एका शेळीला घेऊन पसार झाला.
या आधी जाधव वस्तीतही अर्जुन भोईर यांच्या शेळीवर हल्ला केला होता. परंतु भोईर जागे झाल्याने बिबट्या शेळीला घेऊन पळाला. परिसरात नागरिकांवर हल्ले झाल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व शाळेत येणाऱ्या मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनरक्षक एस.जी. मोमीन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याचे सांगितले. (वार्ताहर)