Maratha Reservation: संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 02:22 PM2021-06-14T14:22:00+5:302021-06-14T14:48:21+5:30
आज पुण्यात झालेल्या भेटीनंतर घोषणा आंदोलनात सहभागी होण्याबाबत मात्र उदयनराजे भोसलेंची भूमिका स्पष्ट नाही.
मराठा आरक्षण प्रश्नावर छत्रपती संभाजीराजेंनी पुकारलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं उदयनराजे भोसले यांनी जाहीर केले आहे. मात्र त्याच वेळी ते या आंदोलनात सहभागी होणार का याबाबत मात्र ते थेट काही बोलले नाहीत.
पुण्यात आज मराठा आरक्षण प्रश्नावर आज छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट झाली. पुण्यातील औंध परिसरात झालेल्या या भेटीमध्ये दोन्ही राजेंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.
याबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले," दोन घरणी सातारा आणि कोल्हापूर ही एकत्र आली,भेट घेतली याचा आनंद आहे."
आजच झालेल्या शाहू महाराज आणि अजित पवारांचा भेटी बद्दल मात्र आपल्याला काहीच माहीत नसल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला."शाहू महाराज आणि अजित पवारांची भेट झाली त्याबद्दल मला कल्पना नव्हती.ते आशीर्वाद घ्यायला आले असतील.मात्र जर त्यातून काही निघणार असेल तर आनंद आहे." असं ते म्हणाले.
याच भेटी नंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी संभाजी राजेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले" आम्ही दोघं एकाच घराण्याचे. त्यांचा विचारांशी मी सहमत आहे. देशाची फाळणी करायची आहे का राज्यकर्त्यांना?राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही यासाठी जबाबदार. व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केलं नाही. आंदोलन वगैरे काय होणार ? आरक्षण द्यायचं असतं तर ते मागेच दिलं असतं."मात्र ते स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत का याबाबत मात्र उदयनराजेंनी कोणतंही स्पष्ट वक्तव्य केलं नाही.