Ujani Dam: पाऊस फुल धरण हाऊसफुल! उजनी १०० टक्के भरले; बळीराजाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:30 PM2022-08-12T12:30:54+5:302022-08-12T12:31:08+5:30

धरणात एकूण पाणीपातळी ४९६.८१ मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल ११८ टीएमसीपर्यंत गेला आहे

Ujani dam100 percent filled Great relief to farmer | Ujani Dam: पाऊस फुल धरण हाऊसफुल! उजनी १०० टक्के भरले; बळीराजाला मोठा दिलासा

Ujani Dam: पाऊस फुल धरण हाऊसफुल! उजनी १०० टक्के भरले; बळीराजाला मोठा दिलासा

googlenewsNext

कळस : उजनी धरण सध्या शंभर टक्क्यांवर गेले असून ११८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दौंडवरुनधरणात ४६ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. धरण हाऊसफुल्ल झाले असून भीमा नदीत ३० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण पुर्ण भरले असून धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
जुलै महिन्यात झालेल्या तसेच दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात खडकवासलासह सर्वच धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ते अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाने  १०० टक्क्यांची पाणी पातळी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण उणे पातळीत होते. उजनी जलाशयावरील खडकवासलासह १९ धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे. 

उजनी धरणामध्ये पूर्वी ६० हजार क्युसेक, त्यानंतर कमी कमी होत ६ हजार क्युसेक असा विसर्ग झाला होता. दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे  विसर्गात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवार दि १२ रोजी दौंड येथून उजनी धरणात ४६ हजार क्युसेक इतके पाणी सोडले जात होते. धरणात एकूण पाणीपातळी ४९६.८१ मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल ११८  टीएमसीपर्यंत गेला आहे. त्यापैकी धरणात उपयुक्त पाणीसाठा ५३.८७ टीएमसी  झाला आहे.

Web Title: Ujani dam100 percent filled Great relief to farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.