उजनीतील पाणीसाठा झाला निम्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:43 AM2018-08-19T00:43:42+5:302018-08-19T00:43:59+5:30

१५ धरणांतून पाणी सोडले; ३ दिवसांत पावणेपाच टीएमसी पाणी झाले जमा

Ujani water reservoir was half | उजनीतील पाणीसाठा झाला निम्मा

उजनीतील पाणीसाठा झाला निम्मा

Next

पुणे : जिल्ह्यातील बहुतांश धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने सोलापूरची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७.१२ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत उजनीत ४.७५ टीएमसी पाणी जमा झाले आहे. शनिवारीदेखील जिल्ह्यातील २४ धरणांपैकी १५ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे उजनीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
जिल्ह्यातील माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रात ३, डिंभे १, कळमोडी ६, भामा-आसखेड २, वडीवळे २०, आंद्रा २, पवना १९, मुळशी २६, टेमघर ३१, वरसगाव १६, पानशेत १२ आणि खडकवासला धरण क्षेत्रात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी धरण क्षेत्रात ४ आणि नीरा देवघरला २१ मिलिमीटर पाऊस झाला.
शनिवारी सकाळी आठपर्यंत पिंपळगाव जोगे २१, माणिकडोह २९, कळमोडी १६, वडीवळे ४६, आंद्रा ११, पवना ४८, मुळशी २७, टेमघर ५८, वरसगाव ३३ आणि पानशेतला ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
धरणक्षेत्रात संततधार सुरु असल्याने खडकवासला प्रकल्पातील वरसगाव धरणातून ६ हजार ७९, पानश्ेत १ हजार ९५४ आणि पुढे खडकवासल्यातून ११ हजार ७६७ क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुठा नदी दुथडी भरून वाहिली. मुळशी ५ हजार, कासारसाई ४००, पवना २ हजार २०८, आंद्रा ५१६, वडीवळे १३७, चासकमान ३ हजार २०, कळमोडी ५९१, डिंभे ५ हजार ३७९ आणि वडज धरणातून ८०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.

उपयुक्त पाणीसाठा २७.१२ टीएमसी
जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७.१२ टीएमसी (५०.६१ टक्के) झाला आहे. उजनीत १६ अ‍ॅगस्ट रोजी सकाळी २२.३७ टीएमसी साठा होता. त्यात शनिवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४.७५ टीएमसीची भर पडली. नीरा देवघरमधून ६ हजार ८०८, भाटघर ५ हजार ६४ आणि वीर धरणातून १३ हजार ९९१ क्युसेक्सपाणी नदीत सोडण्यात आले.

खडकवासला प्रकल्पातील वरसगाव धरणात १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.९७ (सर्व शंभर टक्के) आणि टेमधर धरणात २.२४ (६०.३१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २७.६८ टीएमसी (९४.९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात चारही धरणांत मिळून २४.८३ टीएमसी (८५.१७ टक्के) पाणीसाठा होता.

Web Title: Ujani water reservoir was half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.