उजनीची धग बारामतीच्या ‘गोविंदबाग’पर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:19+5:302021-05-27T04:10:19+5:30

आंदोलनासाठी पोहचले शेतकरी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत ‘स्वीय सहायकां’शी घडवला संवाद बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ...

Ujani's cloud up to 'Govindbagh' of Baramati | उजनीची धग बारामतीच्या ‘गोविंदबाग’पर्यंत

उजनीची धग बारामतीच्या ‘गोविंदबाग’पर्यंत

Next

आंदोलनासाठी पोहचले शेतकरी

ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत ‘स्वीय सहायकां’शी घडवला संवाद

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती) येथील गोविंदबाग या निवासस्थानासमोर उजनीच्या पाण्यावरून खर्डा भाकरी आंदोलन करण्यासाठी मोहोळ (जि. सोलापूर) चे दोन शेतकरी पोहचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांच्याशी चर्चा घडवून आणली. आंदोलक शेतक-यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांना सोेडून देण्यात आले.

नागेश वनकळसे आणि महेश पवार अशी आंदोलकांची नावे आहेत. पवार हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत तर नागेश वनकळसे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी, तसेच काटेवाडी येथे बुधवारी (दि.२६) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय नुकताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द ठरवला आहे. त्यानंतर उजनीचे पाणी चांगलेच पेटले आहे. इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या स्थनिक कार्यकर्त्यांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी इंदापूर तालुका शेतकरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इंदापूर आणि सोलापूरचा वाद धुमसतच आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील शेतकरी गोविंद बागेसमोर आंदोलनासाठी हे शेतकरी पोहचले होते.

याबाबत नागेश वनकळसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आम्ही खर्डाभाकर आंदोलन ठेवले होते. इंदापूरला पळविलेल्या पाण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केवळ तोंडी सूचना केली आहे. याबाबत शासनाचा कोणताही लेखी आदेश निघालेला नाही. सोलापूर जिल्ह्यात अगोदरच पाणी वाटप झालेल आहे. पाण्याचा एकही थेंब शिल्लक नाही. सांडपाण्याच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी उचलले जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष घालून न्याय द्यावा यासाठी आमची कै फीयत मांडण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आम्हाला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर मुंबई येथील ‘पवारसाहेबां’च्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांचे स्वीय सहायक सुनील राऊत यांच्याशी फोनवर आमची चर्चा घडवून आणली. राऊत यांनी पोलीस प्रशासनाला आमचे निवेदन स्वीकारून पाठवून देण्याची सूचना केली आहे. हा विषय ‘पवारसाहेबां’पुढे मांडण्याचे राऊत यांनी आश्वासन दिल्याचे वनकळसे म्हणाले. महाराष्ट्र समृध्द करण्यात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. तेच याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. कारण सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांनी साहेबांवर प्रेम केले आहे. खर्डा भाकर आंदोलन हे आमच्या गरिबीचे प्रतीक आहे. आमचा विषय, आमची याचना त्यांच्यापर्यंत पोहचविणे हाच आमचा हेतू होता. त्यासाठी हे आंदोलन केल आहे. पुढची आमची भूमिका न्यायालयीन असणार आहे. आम्ही २५ ते ३० जण येणार होतो. मात्र, आमच्या इतर सहका-यांना तेथील पोलिसांनी मंगळवारी रात्रीच स्थानबध्द केल आहे. आम्ही दोघजण गनिमी काव्याने या ठिकाणी पोहचलो. आमची याचना त्यांच्यापर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे वनकळसे म्हणाले.

...त्यांनी आख्खं तळच पळविले

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. पालकमंत्री जिल्ह्याचे विश्वस्त आहेत. खरेतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे हित पहायचे असते. ते जिल्ह्याचे पालक असताना त्यांच्या इंदापूरला ५ टीएमसी पाणी त्यांच्या नेतृत्वाखाली नेले जात आहे. हे कुठंतरी विश्वासार्हतेला तडा जाणारे आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडलेला नाही. जो तळ राखतो, तो पाणी पिणार असे नाही, तर त्यांनी आख्खं तळच पळविलेले असल्याचे नागेश वनकळसे म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर होणा-या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त होता.

२६०५२०२१ बारामती—११

Web Title: Ujani's cloud up to 'Govindbagh' of Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.