चिंचोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्ज्वला गोकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:15+5:302021-03-07T04:10:15+5:30
शेलपिंपळगाव : चिंचोशी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या समर्थक उज्ज्वला सुरेश गोकुळे, तर ...
शेलपिंपळगाव : चिंचोशी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या समर्थक उज्ज्वला सुरेश गोकुळे, तर उपसरपंचपदी माया संभाजी निकम यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी - काँग्रेसचा झेंडा फडकविला असून ग्रामस्थांनी महिलांना गावचा कारभार चालविण्याची संधी दिली आहे.
सरपंचपदासाठी उज्ज्वला गोकुळे व सुनील जाधव यांनी, तर उपसरपंच पदासाठी माया निकम व सुभाष मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार गुप्तमतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये उज्ज्वला गोकुळे व माया निकम यांना प्रत्येकी पाच - पाच मते मिळवून प्रतिस्पर्धींचा चार मतांनी पराभव केला. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर सुपे यांनी दोन्ही उमेदवारांची निवड झाल्याचे घोषित केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अमोल कानडे, सचिन भोसकर, सुनील जाधव, मंगल शिंदे, सीमा गोकुळे, सुभाष मोरे, कविता गोकुळे, तुषार निकम, प्रकाश गोकुळे, विजय गंगावणे, बाबाराजे दौंडकर, संजय गोकुळे, विपुल गोकुळे, विष्णू गोकुळे, रमेश गोकुळे, रमेश गोकुळे, सुरेश निकम, पांडुरंग निकम, मंगेश निकम, दत्तात्रय दरगुडे, राजेंद्र गोकुळे, बजरंग दरगुडे, गणेश गोकुळे, राजाराम भोसकर, नितीन निकम आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. पदाच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास साधणार असल्याची माहिती नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.
फोटो : १) उज्ज्वला गोकुळे.
२) माया निकम.