उल्हास पवार यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:26+5:302020-12-14T04:27:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा गदिमा जीवनगौरव सन्मानासाठी यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा गदिमा जीवनगौरव
सन्मानासाठी यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी आमदार उल्हास पवार यांची सर्वानुमते
निवड करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड येथे गेली २७ वर्षे गदिमा कविता महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वर्षीचा गदिमा कविता महोत्सव सांगली जिल्ह्यातील माडगूळ, तालुका आटपाडी येथे गदिमांच्या जन्मगावी लवकरच होणार आहे. यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आदी मान्यवरांना गदिमा जीवनगौरव सन्मान देऊन गौरविले आहे. गदिमा १०१ वी जयंती आणि ४३ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पुणे विभागाचे राजेंद्र वाघ आणि पिंपरी-चिंचवड विभागाचे सुरेश कंक यांनी कळवली आहे.