अखेर अस्तरीकरणाला गती

By admin | Published: February 29, 2016 01:03 AM2016-02-29T01:03:10+5:302016-02-29T01:03:10+5:30

भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातंर्गत येणाऱ्या उजव्या कालव्याला सतत गळती होत असल्याने सध्या पाटबंधारे विभागाकडून कालव्याच्या यांत्रिक पद्धतीने सिमेंट काँकिटच्या अस्तरीकरणाचे काम वेगात सुरू आहे.

Ultimately, the speed of the extinction | अखेर अस्तरीकरणाला गती

अखेर अस्तरीकरणाला गती

Next

भोर : भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातंर्गत येणाऱ्या उजव्या कालव्याला सतत गळती होत असल्याने सध्या पाटबंधारे विभागाकडून कालव्याच्या यांत्रिक पद्धतीने सिमेंट काँकिटच्या अस्तरीकरणाचे काम वेगात सुरू आहे.
मात्र, १० वर्षे होऊनही कालवा आणि त्यावरच्या उपसा जलसिंचन योजना अपूर्णच आहे.
शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा असून प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार.
तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या नीरा देवघर धरणाचा पाणीसाठा ११.९१ टीएमसी असून, धरणातून भोर ते माळशिरस असा
१९८ किलोमीटरचा उजवा कालवा आहे. कालव्याचे १ ते ६५ किलोमीटरपर्यंत एक ते दोन ठिकाणचे खोदकाम वगळता पूर्ण झाले आहे. पुढील १३३ किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. शनिवारी (दि. २७) वेनवडी (भोर), शेकमिरवाडी,
वाघोशी (फलटण), गावडेवाडी (खंडाळा) अशा चार उपसा जलसिंचन योजना आहेत.
या कामाची मुदत दोन वर्षांची असल्याने सध्या वेगात काम सुरू आहे. दरम्यान, ११ ते २० किलोमीटरच्या अस्तरीकरणाच्या कामाचे १५ कोटीचे अंदाजपत्रक मंजूर आहे.
निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण होतील, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
धरणाच्या कालव्याचे काम सुरू होऊन १० वर्षे झाली. मात्र, निधीचे कारण देत अद्याप १ ते ६५ किलोमीटरपर्यंतचेच खोदकाम पूर्ण असून, पुढील काम सुरूच झालेले नाही, तर त्यावर चार उपसा जलसिंचन योजनांपैकी एका योजनेचे काम अपूर्ण तर तीनचे काम सुरूच नाही.
त्यामुळे कालव्याचे व उपसा जलसिंचन योजनांचे काम पूर्ण
होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार, हे न सुटणारे कोडेच आहे. (वार्ताहर)
४भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर, फलटण तालुक्यातील १२,५५० हेक्टर, माळशिरस तालुक्यातील १०,९७० हेक्टर, खंडाळा १२,८६० हेक्टर असे ४३,०५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र, भोर तालुक्यातील वेनवडी उपसा जलसिंचन योजनेचे काम थोड्याफार प्रमाणात पूर्ण झाले आहे. इतर तीनही उपसा जलसिंचन योजनांचे सर्वेक्षणच सुरू आहे. धरणाच्या उजव्या कालव्याचा सध्या १ ते १० किलोमीटरचे सुमारे १२ कोटी ९८ लाख रु काम मंजूर असून, यांत्रिक पद्धतीने सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. पहिल्या किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, तीन - चार किलोमीटरची साफसफाई होऊन काम सुरू झाले
आहे.

Web Title: Ultimately, the speed of the extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.