अारक्षणावरुन धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 04:25 PM2018-07-30T16:25:50+5:302018-07-30T16:27:56+5:30
अारक्षणाच्या मुद्यावरुन अाता धनगर समाजही अाक्रमक झाला असून या समाजाकडून सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देण्यात अाला अाहे.
पुणे : राज्यात मराठा समाजाच्या अारक्षणासाठीचे अांदाेलन तीव्र हाेत असताना अाता धनगर समाजाने सुद्धा अारक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम दिले अाहे. सरकारने जाहीर केलेले 93 हजार धनगडांमधील एकतरी 'धनगड' एका महिन्यात दाखवावा अन्यथा परिणामाला सामाेरे जावे असा इशारा 'धनगर' समाजाकडून देण्यात अाला अाहे. धनगर समजाच्या नेत्यांनी साेमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उत्तमराव जानकर, गाेपीचंद पडळकर उपस्थित हाेते.
राज्यातील दिड काेटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षांपासून घटनादत्त अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड अादिवासी जमात उभी करुन समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवले अाहे. 2014 साली धनगर समाजाने अारक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून भाजपाचे सरकार अाणले. परंतु मुख्यमंत्र्यांनी अारक्षणाचा प्रश्न साेडविण्याएेवजी टाटा इन्स्टिट्यूट अाॅफ साेशल सायन्स (टिस्स) च्या माध्यमातून धनगरांना अारक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालवली असल्याचा अाराेप उत्तम जानकर अाणि गाेपीचंद पडळकर यांनी यावेळी केला. जानकर म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, अादिवासी मंत्रालय यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड अाढळून अाला नाही. दरम्यान, धनगर समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93 हजार धनगड, तर एकूण 19 लाख 50 हजार बाेगस अादिवासी दाखविले अाहेत. यावर अादिवासी समाजाने त्यांच्या लाेकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 9.5 अामदार, तर 30 ट्क्के अनुदान अाणि 30 टक्के नाेकऱ्या या इतर समाजाच्या बाेगसगिरी करुन हडपल्या अाहेत.
धनगर शब्दामध्ये 'र' चा 'ड' झालेला असून ताे देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत अाहे. दरम्यान 1 अाॅगस्ट राेजी 1 लाखाच्या संख्येने धनगर समाज पुण्यातील दुधाणे लाॅन्स, कर्वेनगर येथे जमा हाेणार अाहे. यावेळी धनगर अारक्षणाच्या धगधगत्या स्फुर्ती गीताच्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन करण्यात येणार अाहे. सरकारने एका महिन्याच्या अात 93 हजार धनगडांमधील एकतरी धनगड दाखवला नाही तर हाेणाऱ्या परिणामांना सरकारला सामाेरे जावे लागेल असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात अाला अाहे.