दूध डेअरीचे ४०० काेटींचे बेहिशेबी उत्पन्न पुण्यात उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:00 AM2021-12-03T09:00:17+5:302021-12-03T09:04:31+5:30
Pune News: पुण्यातील एका माेठ्या खासगी दूध डेअरीचे ४०० काेटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न प्राप्तिकर खात्याने उघडकीस आणले आहे. दूध डेअरीने जनावरांच्या मृत्यूचे खाेटे दावेही दाखविल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली.
नवी दिल्ली : पुण्यातील एका माेठ्या खासगी दूध डेअरीचे ४०० काेटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न प्राप्तिकर खात्याने उघडकीस आणले आहे. दूध डेअरीने जनावरांच्या मृत्यूचे खाेटे दावेही दाखविल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली.
प्राप्तिकर खात्याने २४ नोव्हेंबरला पुण्यासह सहा शहरांमधील सुमारे ३० ठिकाणांवर छापे मारले हाेते. छाप्यांदरम्यान सहा काेटी रुपये बेहिशेबी राेख आणि अडीच काेटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान काही लाॅकर्सदेखील सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४०० काेटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळून आले आहे. दूध डेअरीने माेठ्या प्रमाणात करचाेरी केल्याचे सीबीडीटीने सांगितले.बाेगस खरेदी, बेहिशेबी विक्री, राेखीचे कर्ज आणि त्यांचे पेमेंट इत्यादी गैरव्यवहार माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.
डेअरीने जनावराच्या खाेट्या मृत्यूचे दावे दाखवून नुकसानभरपाई उकळल्याचेही आढळून आल्याचे सीबीडीटीने सांगितले. डेअरीने करयुक्त उत्पन्नाचा स्वतंत्र लेखाजाेखादेखील ठेवलेल्या नसल्याचे आढळून आले आहे.