अनधिकृत बांधकामांचे पेव

By admin | Published: November 16, 2015 01:55 AM2015-11-16T01:55:29+5:302015-11-16T01:55:29+5:30

ग्रामपंचायती जाऊन नगर परिषदा आल्या तरी राजगुरुनगर आणि चाकण परिसरात अनधिकृत बांधकामे रोखण्यास प्रशासनाला यश आलेले नाही

Unauthorized construction work | अनधिकृत बांधकामांचे पेव

अनधिकृत बांधकामांचे पेव

Next

राजगुरुनगर : ग्रामपंचायती जाऊन नगर परिषदा आल्या तरी राजगुरुनगर आणि चाकण परिसरात अनधिकृत बांधकामे रोखण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे सुरूच असून, या दोन्ही शहरांच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने ही अनधिकृत बांधकामे मोठा अडथळा ठरणार आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेने अशा सुमारे ४० बांधकामाना नोटिसा बजावल्या असूनही बांधकाम करणारे नोटिसांना न जुमानता बांधकामे करीतच आहेत.
पिंपरी-चिंचवडनंतर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये चाकण आणि राजगुरुनगरचा समावेश होतो. विशेषत: चाकण हे औद्योगिक वसाहतीमुळे वेगाने विकसित होत आहे. मात्र गेल्या वर्षीपर्यंत येथे ग्रामपंचायती असल्यामुळे अनधिकृत बांधकामे वेगाने सुरूहोती. त्यामुळे या गावाचे अंतर्गत रस्ते अतिशय अरुंद राहिले आहेत. बहुमजली इमारती झाल्या, पण वाहनतळ नसल्याने वाहने उभी करण्याचा प्रश्न आहे. परिणामी रस्त्यवर वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यात पथारीवाल्यांची आणि वडापावसारख्या गाड्या लावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.
अनधिकृत बांधकामांमुळे कचरा, सांडपाणी यांचेही मोठे प्रश्न या गावांमध्ये उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी गटारे नाहीत. असलेली एवढ्या बांधकामांना पुरी पडत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवरून पाणी वाहात असते. पावसाळ्यात तर रस्तेच गटारे होऊन जातात. कचरा उचलणे स्थानिक व्यवस्थापनाला शक्य होत नाही. या अस्ताव्यस्त बांधकामांमुळे वीज, पाणीपुरवठा या व्यवस्थांवर ताण येतो. आगीसारखी घटना घडली तर बंब घुसविताना आणि तो उभा करताना सुद्धा मुश्कील होते.
राजगुरुनगरमध्ये गेल्या महिन्यात एक छोटी आग लागली तेव्हा हा अनुभव नागरिकांना आला होता. या समस्या असतांनाही अनधिकृत बांधकामे थांबत नाहीत. त्यांना कोणीही अटकाव करू शकत नाही याची खात्री पटली आहे. गावातले रस्ते अरुंद
झाल्याने चाकणला फार पूर्वीच पुणे- नाशिक महामागार्ला बाह्यवळण काढावे लागले. आता राजगुरुनगरलाही याच कारणाने बाह्यवळण होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Unauthorized construction work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.