अनधिकृत बांधकामे हटविली, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:25 IST2018-10-01T00:25:09+5:302018-10-01T00:25:39+5:30
पवनानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाची बाजारपेठेत कारवाई

अनधिकृत बांधकामे हटविली, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई
पवनानगर : पवनानगर बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राकेश सोनवणे यांनी दिली.
पवनानगर बाजारपेठ या परिसरातील ४० गावे व वाड्यावस्त्यांसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ समजली जाते. त्यामुळे बाजारपेठेत दररोज वर्दळ असते. त्यातच या परिसरामध्ये पवना धरण, तुंग, लोहगड, विसापूर, तिकोणा हे ऐतिहासिक किल्ले, प्रतिपंढरपूर, लेणी अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ पाहण्यास मिळते. त्यामुळे चौकात नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच पवनानगर बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या जागा सोडून रस्त्यापर्यंत अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे.
अनेकदा वादाचे प्रकार घडत असतात. अनेक प्रकारे पोलिसांच्या मदतीने साडोविले जातात. वाहनचालकांना कुणी समजुन सांगण्यास गेल्यास अरेरावीचा भाषा वापरली जाते.त्यामुळे अनेकदा सार्वजनिक विभागाकडे तक्रारी झाल्या आहेत. त्यानंतर विभागाकडून संबधित अतिक्रमण करणाºयांना यापूर्वी नोटिसा देण्यात आला होत्या. त्यामुळे आज पवनानगर चौकातील रस्त्यावर आलेली अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने पाडली आहेत. त्यामुळे ज्या व्यापाºयांनी व नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यांनी स्वत:हुन अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले होते. लोणावळा ग्रामीणचे निरिक्षक रामदास इंगवले, पोलीस नाईक एस. एम. शेख एस.पी गवारे, होमगार्ड एस. बी. घारे उपस्थित होते.