जेजुरीतील पेशवेकालीन तलावात अनधिकृत उत्खनन

By admin | Published: June 29, 2015 11:48 PM2015-06-29T23:48:17+5:302015-06-29T23:48:17+5:30

येथील जुनी जेजुरी परिसरातील पेशवेकालीन ऐतिहासिक पेशवे तलावात अनधिकृत मुरूम व माती उपसा करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाकडून आज कारवाई करण्यात आली.

Unauthorized exploration in jejunine peshawar lake | जेजुरीतील पेशवेकालीन तलावात अनधिकृत उत्खनन

जेजुरीतील पेशवेकालीन तलावात अनधिकृत उत्खनन

Next

जेजुरी : येथील जुनी जेजुरी परिसरातील पेशवेकालीन ऐतिहासिक पेशवे तलावात अनधिकृत मुरूम व माती उपसा करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाकडून आज कारवाई करण्यात आली. सादर वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती मंडलाधिकारी संजय बडदे यांनी दिली.
या तलावात अनेक दिवसांपासून बेकायदा मुरूम व माती उपसण्यात येत असल्याचा सुगावा महसूल विभागाला लागला होता. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी संजय बडदे, जेजुरीचे तलाठी बाळासाहेब ढमढेरे, तलाठी प्रफुल्ल व्यवहारे आदींनी छापा टाकून माती व मुरूमाचे अनधिकृत उत्खनन करताना पकडले. या कारवाईत उत्खननासाठी वापरण्यात येणारी वाहने, दोन जेसीबी (एमएच १२ एबी ३२३ आणि एमएच २३ टी २०४०), एक टेम्पो (एमएच १२ केपी २२८१), तसेच एक ट्रॅक्टर (एमएच १२ एडी ४२२५) ही वाहने जप्त केली आहेत.
जप्त केलेली वाहने जेजुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली असून, अनधिकृत उत्खनन आणि ऐतिहासिक तलावाला धोका निर्माण होईल, आशा स्वरूपाचे उत्खनन होत असल्याचा अहवाल प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आला आहे. या वाहनांच्या मालकांची नावे समजू शकली नाहीत. त्यांच्यावर प्रांत कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडलाधिकारी बडदे यांनी सांगितले.

Web Title: Unauthorized exploration in jejunine peshawar lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.