शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:32 PM2018-08-16T14:32:32+5:302018-08-16T14:56:47+5:30

एकीकडे भरमसाठ वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सध्या शहराची फारच डोकेदुखी ठरत आहे. याच धर्तीवर या वाहतूक समस्येचे कारण ठरणारे अनधिकृत फेरीवाल्यांवर यापुढे प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

Unauthorized hawkerson target of the administration in the city | शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर 

शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर 

Next
ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत कारवाईचा प्रशासनाचा अभिप्राय मान्य शहरातील ६,६६२ फेरीवाल्यांचे ४२० ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार

पुणे: शहरात दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडून देखील अनेक तक्रारी येत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत फेरीवाल्याचे पुनर्वसन करणे देखील शक्य नाही. यामुळे यापुढे शहरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचा प्रशासनाचा अभिप्राय स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
    प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायमध्ये महापालिकेच्या जुन्या हद्दीत व पेठांमध्ये अ, ब, क वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यास जागा अपु-या पडत असून, त्यामुळे ड व ई वर्गवारीतील व्यावसायिकांचे वाहतुकीचे व स्थानिक नागरिकांच्या येणा-या तक्रारींच्या अनुषंगाने पुनर्वसन करणे शक्य होणार नसल्याने वाहतुकीस होणारा अडथळा विचार घेऊन कारवाई करण्याचा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.
शहरातील २८,२५२ फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात २१ हजार ३२ फेरीवाल्यांची संगणकीय नोंदणी झाली आहे. २० हजार ६८५ फेरीवाल्यांना त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. उर्वरीत फेरीवाल्यांनी कागदपत्रे न दिल्यामुळे किंवा व्यवसाय करत नसल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र वाटण्यात आलेली नाहीत. पहिल्या टप्प्यात पहिल्या तीन वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन मान्य झालेल्या ४२० पुनर्वसन हॉकर्स झोनमध्ये करण्यासाठी व ड व ई वर्गवारीतील व्यावसायिकांचे जागा शिल्लक राहिल्यास दुस-यास टप्प्यात पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बाबींना प्रभाग समिती व शहर फेरीवाला समिती यांची मान्यता घेवून मुख्य सभेच्या अन्वये उपसुचनांना मान्यता देण्यात आलेल्या महापौरांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीमध्ये (गटनेते व पदाधिकारी) वेळोवेळी मान्यता घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरातील ६,६६२ फेरीवाल्यांचे ४२० ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. उर्वरीत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनची कार्यवाही सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या ओटा मार्केटमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Unauthorized hawkerson target of the administration in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.