राज्य उत्पादन विभागाच्या छाप्यात बेकायदा मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:04 PM2018-09-11T16:04:03+5:302018-09-11T16:04:24+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवडच्या पथकाने भोर शहरासह ३ गावात छापा टाकत बेकायदा देशी विदेशी दारु जप्त केली. पोलिसांनी एका मोटारीसह ४४ हजार ९८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भोर : राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवडच्या पथकाने भोर शहरासह ३ गावात छापा टाकत बेकायदा देशी विदेशी दारु जप्त केली. पोलिसांनी एका मोटारीसह ४४ हजार ९८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक महिन्यात निगुडघर येथे दुसरी कारवाई करण्यात आली आहे.सासवड उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सोपान कान्हेकर व ३ जवान यांच्या पथकाने रात्री निगुडघर येथे गस्तीवर असताना एल मोटार संशयितरित्या दिसली. वाहनाची झडती घेतली असता विदेशी मद्याच्या ४८ तर देशी मद्याच्या १४४ बाटल्या मिळून आल्या. मात्र अंधाराचा फायदा घेऊन गाडीचा चालक पसार झाला. दुसºया कारवाईत नागोबाआळी येथे गावठी हातभटटी दारुची विक्री करित असताना आरोपी दीप ईश्वरदिन दहियात याला ४५ लिटर हातभटटी दारुसह अटक केली. तर सांगवी (ता.भोर) येथील जगन्नाथ हनुमंत भंडारी याला १२० लिटर ताडीसह अटक केली आहे. तर सांगवीतीलच योगेश संजय राजावत यास १५ लिटर गावटी दारुसह अटक केली. एकूण तीन ठिकाणच्या कारवाईत करीत आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.