वडगावशेरीत अनधिकृत फलकांचे पीक

By admin | Published: December 22, 2016 02:27 AM2016-12-22T02:27:14+5:302016-12-22T02:27:14+5:30

महापालिकेची निवडणुकीची येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांनी

Unauthorized peaks crop in Vadgaavashir | वडगावशेरीत अनधिकृत फलकांचे पीक

वडगावशेरीत अनधिकृत फलकांचे पीक

Next

चंदननगर : महापालिकेची निवडणुकीची येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वडगावशेरी, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर भागांत फलकबाजी सुरू केली आहे. निवडणुकीतील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने फलकांची संख्याही तेवढीच असल्याने परिसर मात्र विद्रूप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
नगररस्ता आकाशचिन्ह विभागही कारवाई करून फलक हटवत आहे. मात्र एकाचा फलक काढला, की लगेच दुसऱ्याचा फलक झळकतो. त्यामुळे फलक लावण्याऱ्यांसमोर नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अनधिकृत फलक लावू नये व शहर विद्रूप करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना फलक लावले जात आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने चौकांना, पथदिव्यांना जास्त महत्त्व आले आहे. चंदननगर छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, खराडी चौक, बायपास चौक, विमाननगर चौक, रामवाडी हायत, टाटा गार्डरूम, संघर्ष चौक, द्वारका गार्डन, गणेशनगर, आनंदपार्क, वडगावशेरी गावठाण, छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान चौक वडगावशेरी, कल्याणीनगर अ‍ॅडलॅब चौक, विमाननगर दत्तमंदिर चौक, गणपती चौक, सिम्बॉयसिस विमाननगर या सर्व चौकांसह परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर पथदिव्यांवर फलक लावले जात आहे.
दिवाळीपासून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक बेकायदा फलक काढण्यात आले आहेत. कारवाई होऊनही काहीही परिणाम फलक लावणाऱ्यांवर झालेला नाही. गेल्या तीन दिवसांत तब्बल १२०० बेकायदा फलक काढण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Unauthorized peaks crop in Vadgaavashir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.