तक्रार निवारण दिन अंतर्गत नारायणगाव पोलीस ठाण्यात १६३ पैकी ५६ तक्रारी अर्ज निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:34+5:302021-09-10T04:15:34+5:30
पोलीस महासंचालक यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर नियमितपणे दर महिन्याला तक्रार निवारण दिन आयोजित करून या तक्रार निवारणदिनाला तक्रार अर्जदार, ...
पोलीस महासंचालक यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर नियमितपणे दर महिन्याला तक्रार निवारण दिन आयोजित करून या तक्रार निवारणदिनाला तक्रार अर्जदार, गैरअर्जदार यांना समक्ष बोलावून तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे, पोलीस उपनिरीक्षक सनील धानवे, गुलाबराव हिंगे व सर्व बीट अंमलदार यांच्या उपस्थित १६३ पैकी ५६ तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आले. यामध्ये एपआयआर दाखल - ५ गुन्हे, एनसी दाखल ७ , तडजोड १७ , निनावी तक्रार २ , दिवाणी बाब १५ , प्रतिबंधात्मक कारवाई ०३ समावेश आहे.
तसेच इतर कार्यालयाशी संबंधित ७ पाठवण्यात आले तर मुद्देमाल व कागदपत्र हस्तांतर अंतर्गत ५ वाहने ताब्यात देण्यात आली. या वेळी ७५ अर्जदार उपस्थित होते.
--------