महाकृषी अभियान अंतर्गत ६७ टक्के वीजबिल होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:49+5:302021-03-14T04:10:49+5:30

येडके म्हणाले की शिरूर, दौंड, शिक्रापूर, केडगाव विभागात १०६९ कोटी रुपयांची कृषी पंप बिलाची थकबाकी आहे. यापैकी ८.१३ कोटी ...

Under Mahakrishi Abhiyan, 67% electricity bill will be waived | महाकृषी अभियान अंतर्गत ६७ टक्के वीजबिल होणार माफ

महाकृषी अभियान अंतर्गत ६७ टक्के वीजबिल होणार माफ

Next

येडके म्हणाले की शिरूर, दौंड, शिक्रापूर, केडगाव विभागात १०६९ कोटी रुपयांची कृषी पंप बिलाची थकबाकी आहे. यापैकी ८.१३ कोटी रुपये वसूल झाले आहे. यामधून सवलत देऊन ४४२ कोटी रुपये वसूल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी व ग्राहकांच्या प्रबोधनासाठी सायकल रॅली, रिक्षा या माध्यमामधून प्रबोधन करून योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात येत आहे. या योजनेमधून वसूल झालेल्या वीजबिलामधून ३३ टक्के रक्कम त्याच गावातील नवीन कामासाठी खर्च करून यामधून शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांचे वीजबिल भरले आहे त्यांना त्वरित निकामी झालेले रोहित्र देण्यात येतील. शेतकऱ्यांनी विजेची बचत करण्यासाठी कॅपेसिटर बसविणे बंधनकारक असून त्यासाठी मोहीम सुरु करण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले.

बारामती विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे यांच्या संकल्पनेमधून ‘एक गाव एक दिवस’ ही मोहीम राबविण्यात येत असून, त्यामधे जनतेच्या तक्रारी, नवीन कनेक्शन दुरुस्ती, धोकादायक खांब, तारा बदलणे अशा सार्वजनिक हितांचे प्रश्नांचा सर्वे करून एकाच दिवसात कामे पूर्ण करण्यात येतात.

--

चौकट

दीड महिन्यात ८०७ नवे कृषीपंप जोडणी

गेल्या दीड महिन्यात झिरो पोल असलेल्या ८०७ शेतकऱ्यांना नवीन कृषी पंपाचे जोड देण्यांचे उल्लेखनीय काम शिरूर दौंड तालुक्यात झाले आहे .

शेतकऱ्यांनी वीजबिल वेळेत भरल्यास आपल्या भागातील विजेचे कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने सर्वानी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आव्हान कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी केले आहे.

--

Web Title: Under Mahakrishi Abhiyan, 67% electricity bill will be waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.