Pune : पुणे जिल्ह्यात १७ लाखांहून अधिक महिलांनी केला ST बसने अर्ध्या दरात प्रवास

By नितीश गोवंडे | Published: April 18, 2023 05:52 PM2023-04-18T17:52:45+5:302023-04-18T17:59:53+5:30

एक महिन्यात पुणे जिल्ह्यातील १७ लाख १४ हजार महिलांनी एसटीने अर्ध्या तिकीट दरात प्रवास केल्याची माहिती एसटी विभागातर्फे देण्यात आली....

Under Mahila Samman Yojana, more than 17 lakh women traveled by ST at half fare | Pune : पुणे जिल्ह्यात १७ लाखांहून अधिक महिलांनी केला ST बसने अर्ध्या दरात प्रवास

Pune : पुणे जिल्ह्यात १७ लाखांहून अधिक महिलांनी केला ST बसने अर्ध्या दरात प्रवास

googlenewsNext

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटीने प्रवास करताना महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी १७ मार्च पासून सुरू झाली. एक महिन्यात पुणे जिल्ह्यातील १७ लाख १४ हजार महिलांनी एसटीने अर्ध्या तिकीट दरात प्रवास केल्याची माहिती एसटी विभागातर्फे देण्यात आली.

आगार निहाय लाभार्थी...
जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून - १ लाख १६ हजार, स्वारगेट - १ लाख ७ हजार, भोर - १ लाख ५५ हजार, नारायणगाव - २ लाख ८९ हजार, राजगुरुनगर - २ लाख २८ हजार, तळेगाव - ७५ हजार, शिरुर - १ लाख १८ हजार, बारामती - २ लाख २८ हजार, इंदापूर - १ लाख ७१ हजार, सासवड - ९० हजार, दौंड - ६३ हजार, पिंपरी-चिंचवड - ५१ हजार, एमआयडीसी - ८२ हजार अशा एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला ६ कोटी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.

Web Title: Under Mahila Samman Yojana, more than 17 lakh women traveled by ST at half fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.