Breaking| टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 02:04 PM2022-01-29T14:04:38+5:302022-01-29T15:26:25+5:30

ही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे

under secretary level officer arrested from thane in tet exam malpractice case | Breaking| टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास अटक

Breaking| टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास अटक

Next

पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यभरात टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात मोठ्य़ा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी माजी आयुक्त तुकाराम सुपे, सुखदेव डेरे अशा अनेक बड्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक केली आहे. आता मंत्रालयातील उपसचिव दर्जाचे अधिकारी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर (sushil khodvekar) यांना ठाणे शहरातून अटक करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता पुण्यात कोर्टात या अधिकाऱ्याला आणले जाणार आहे. ही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. 

यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करीत असताना म्हाडा व टीईटीच्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले होते.

Web Title: under secretary level officer arrested from thane in tet exam malpractice case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.