धरणांनी गाठला तळ; पाणी योजना संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 07:05 AM2018-05-21T07:05:33+5:302018-05-21T07:05:33+5:30

भाटघर धरणात ७ टक्के : तर नीरा देवघर धरणात १८ टक्के पाणीसाठा

Underground basins; Water scheme in trouble | धरणांनी गाठला तळ; पाणी योजना संकटात

धरणांनी गाठला तळ; पाणी योजना संकटात

googlenewsNext

भोर : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणात केवळ ७ टक्के, तर नीरा देवघर धरणात १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर नीरा देवघर धरणातून ६२० क्युसेक्स, तर भाटघर धरणातून १७०० क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
दोन्ही धरणांतील शिल्लक पाण्यापैकी निम्मा गाळच आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून १५ ते २० दिवस बाकी असून, दोन्ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या २० ते २५ नळपाणी पुरवठा योजनांच्या विहिरींना पाणी कमी पडत असल्याने या योजना धोक्यात आल्या आहेत. सध्या अनेक गावात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दोन्ही धरणांत पाणी कमी असल्याने जनावरांचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
मागील वर्षी भाटघर व नीरा देवघर दोन्ही धरणे १०० टक्के भरलेली, भाटघर धरणात २४ टीएमसी, तर नीरा देवघर धरणात १२ टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, दोन्ही धरणांतून डिसेंबरपासून धरणातून विसर्ग सुरू आहे. यामुळे भाटघरमध्ये ७ टक्के, तर नीरा देवघर धरणात फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
वीर धरणात ५८ टक्के पाणीसाठा असून धरणातून डावा आणि उजवा दोन्ही कालव्यातून शेती व पिण्यासाठी पाणी सोडले आहे. भाटघर व नीरा देवघर धरणातील पाणी गावापासून दोन किलोमीटर पर्यंत आत पाणी गेले आहे. धरणाचा खांडवामळे गावापर्यंत आला आहे.
अनेक वर्षे धरणात माती साचल्याने निम्मा गाळच आहे. त्यामुळे भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मळे, डेरे, सुतारवाडी, कुरुंजी, करंदीबु, कांबरे खुर्द, कांबरे बुदुक वाढाणे, वाकांबे, गोरड म्हसीवली, आस्कवडी जोगवडी हर्णस लव्हेरी, माजगाव, पांगारी, वेळवंड, वारवंड, हिर्डोशी, दुर्गाडी कोंढरी वेणुपुरी या धरणांच्या पात्रातील नळपाणी पुरवठा योजनांच्या विहिरींना पाणी कमी पडत आहे. अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या काठावर तात्पुरत्या स्वरूपात काढलेले ढवरेही आटल्यामुळे अनेक गावात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेक दिवस पाणीपुरवठा योजना बंद राहात आहेत. यामुळे दोन्ही धरण भागातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल सुरु आहेत.

भाटघर व नीरा देवघर धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने या भागातील गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून भूतोंडे, म्हसरबू धनगरवस्ती, जयतपाडची हुंबेवस्ती, डेहेण, साळुंगण, सांगवी वे खो, शिरवली हि.मा या ७ गावे ५ वाड्यांनी टँकरची मागणी केल्यावर २ टँकर व २ पिकअपने वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र, तो पुरेसा नसून अजून टँकर सुरु करण्याची मागणी होत आहे.

घोडेगाव : आंबेगाव, जुन्नर, शिरूरबरोबरच सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेती सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कुकडी प्रकल्पातील ८ धरणांमध्ये १४.६८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी अवघा ४.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये समाधानकारक परिस्थिती आहे. कुकडी प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, डिंभे, विसापूर, चिल्हेवाडी, घोड ही ८ धरणे येतात. यातील येडगाव धरणात २९.२४, माणिकडोह धरणात ८.६७, वडजमध्ये १५.०९, पिंपळगाव जोगेमध्ये ७.०६, डिंभेमध्ये १८.६५, विसापूरमध्ये १७.२३, चिल्हेवाडीमध्ये ८.०६ तर घोड धरणात ० टक्के पाणीसाठा आहे. धरणांमध्ये पाणी असल्याने सध्या कालव्यांमधून पाणी सुरू आहे. गेल्या वर्षी येडगाव धरणात १५.२३, माणिकडोह ३.१८, वडज ५.०१, पिंपळगाव जोगे ०, डिंभे ४.५३, विसापूरमध्ये १२.०९, चिल्हेवाडी १२.०८,तर घोड धरणात ० टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कालव्यांवर पोलीस बंदोबस्त नेमावा लागला होता. यावर्षी पाऊस चांगला पडल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यामुळे शेतकºयांना शेतीला पुरेसे पाणी मिळाले. कुकडी प्रकल्पात कुकडी, मीना, आर, घोड, मांडवी नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत. सध्या या नद्या पूर्ण भरून वाहत आहेत. त्यामुळे पाणी योजनांना पाण्याची अडचण भासलेली नाही.

Web Title: Underground basins; Water scheme in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण