कोरोनाकाळात मानवी अस्तित्वाचे भान अधोरेखित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:38+5:302021-06-30T04:08:38+5:30
डॉ. श्रीपाल सबनीस : ‘लॉकडाऊन : वास्तव व साहित्यिक नोंदी’वर परिसंवाद, कृतज्ञता सन्मान पुणे : ‘मानवी अस्तित्वाचा शोध आणि ...
डॉ. श्रीपाल सबनीस : ‘लॉकडाऊन : वास्तव व साहित्यिक नोंदी’वर परिसंवाद, कृतज्ञता सन्मान
पुणे : ‘मानवी अस्तित्वाचा शोध आणि वास्तवाचे भान लॉकडाऊनमध्ये मिळाले आहे. देशातील विविध संघटना, संस्थांनी जातीधर्माच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन काम केले. या कठीणकाळात माणुसकीचे दर्शन घडवले. राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवत समाजातील प्रत्येक गरजू व वंचित घटकांसाठी सेवाभावी कार्य उभारले,’ असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जय गणेश व्यासपीठ व उचित माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लॉकडाऊन : वास्तव आणि साहित्यिक नोंदी’ विषयावरील परिसंवादात डॉ. सबनीस बोलत होते. कोरोनाकाळात मदतीचा हात देणाऱ्या सेवावृतींचा कृतज्ञता सन्मान या वेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया, पियुष शहा, किरण सोनिवाल, विक्रांत मोहिते, भाऊ थोरात, रवींद्र भुजबळ, मयूर पोटे, विशाल ओव्हाळ आदी उपस्थित होते.
परिसंवादात वैभव वाघ, वैद्य हरीश पाटणकर, डॉ. पद्मश्री पाटील, पराग पोतदार, महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपली मनोगते मांडली.
जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. पियुष शहा यांनी आभार मानले.